प्रतिनिधी / कोल्हापूर
कोल्हापूर विधानपरिषद निवडणूकीला दिवसेंदिवस राजकिय रंग चढत असून आज दि. 24 नोव्हेंबर रोजी विधान परिषद अर्ज छाननी पार पडली. यामध्ये प्रामुख्याने उमेदवार माजी आमदार अमल महाडिक, कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री सतेज पाटील, जिल्हा परिषद सदस्य शशिकांत खोत व माजी जिल्हा परिषद अध्यक्षा शौमिका महाडिक यांचे अर्ज कोल्हापूर स्थानिक विधानपरिषदेसाठी पात्र ठरले आहेत.त्यामुळे पात्र उमेदवार चार असले तरी जुना हिशोब चुकता करण्याची संधी या निमित्ताने दोन्ही गटांना मिळणार आहे.
यामुळे कोल्हापूर विधानपरिषद निवडणूक ही पारंपारिक प्रतिस्पर्धी आमने सामने असणाऱ्या महाडिक – पाटील गटाला आपली सर्व ताकद पणाला लावत राजकिय कस पाहणारी ठरणार आहे. आज कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात अर्ज छाननीनंतर महाडिक-पाटील गटांकडून जोरदार घोषणाबाजी झाली. प्रसंगावधान राखत पोलिसांनी हस्तक्षेप करत दोन्ही गटांना पांगवले. त्यामुळे या निमित्ताने दोन्हीं गटांना आपले सत्ता वर्चेस्व ठेवण्यासाठी आपली राजकिय ताकद पणाला लावावी लागणार आहेत.