बेंगळूर : कर्नाटक विधानसभेचे माजी अध्यक्ष के. आर. पेटे कृष्णा यांचे शुक्रवारी पहाटे निधन झाले. काही दिवसांपासून यकृताच्या कॅन्सरमुळे ते आजारी होते. चेन्नईतील इस्पितळात त्यांच्यावर उपचार करण्यात आले होते. मात्र, उपचाराचा उपयोग होत नसल्याने त्यांना म्हैसूरमधील निवासस्थानी आणण्यात आले होते. मंडय़ा जिल्हय़ातील के. आर. पेठ तालुक्याच्या कोत्तमारनहळ्ळी येथे त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. ते तीनवेळा विधानसभेवर निवडून आले होते. 1996 मध्ये ते मंडय़ा लोकसभा मतदारसंघातूनही निवडून आले होते. 1988 मध्ये एस. आर. बोम्माई यांच्या मंत्रिमंडळात पशुसंगोपन खाते सांभाळले होते. तर 2006 ते 2008 या कालावधीत ते विधानसभेचे अध्यक्ष होते.
Previous Articleराज्यात दिवसभरात 50 हजारहून अधिक जण कोरोनामुक्त
Next Article विनाअनुदान शाळेतील शिक्षकांनाही पॅकेज द्या
Tarun Bharat Portal
Amit Kulkarni a versatile content writer, scriptwriter, and content producer at Tarun Bharat Media. Specializes in sports news, local news entertainment, national news and astrology content. His captivating storytelling and deep industry knowledge make him an expert in crafting engaging narratives.