प्रतिनिधी / सातारा
विधानपरिषद निवडणुकीसाठी सातारा जिल्ह्यातील नेते शशिकांत शिंदे यांना राष्ट्रवादी काँग्रेसने उमेदवारी दिली आहे. त्यामुळे सातारा जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नवचैतन्य आले आहे. आज सकाळी शिंदे यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह राष्ट्रवादीचे अन्य नेते उपस्थित होते.
शशिकांत शिंदे हे मूळचे जावली तालुक्यातील हुमगावचे आहेत. त्यांचे शिक्षण बीकॉम पर्यंत झाले आहे.1999च्या निवडणूकीत 12 हजार मतांनी जावलीचे आमदार म्हणून निवडून आले. 2001 ला मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीवर बिन विरोध संचालक झाले. त्यानंतर राष्ट्रवादी महाराष्ट्र कामगार युनियनचे अध्यक्ष म्हणून निवड झाली. 2004 ला पुन्हा जावलीत 44 हजारच्या मताधिक्याने आमदार म्हणून विजयी झाले आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष पदाची धुरा आली.
जानेवारी 2006 मध्ये राष्ट्रवादीच्या लेबर सेलचे प्रदेशाध्यक्षपदी निवड झाली.2009 च्या विधानसभेला कोरेगावातून 31 हजार 753 मतांनी विजयी होऊन आमदार झाले. विधिमंडळ मध्ये मुख्य प्रतोद झाले. ऑक्टोबर 2012 मध्ये पक्षाच्या प्रवक्ते पदी निवड झाली. जून 2013 मध्ये सातारचे पालकमंत्री झाले.ऑक्टोबर 2014 मध्ये झालेल्या विधानसभेच्या निवडणूकीत कोरेगावातून 47 हजार 247 मतांनी विजयी होत पुन्हा आमदार झाले.नोव्हेंबर 2014 मध्ये राष्ट्रवादीच्या मुख्य प्रतोदपदी पुन्हा निवड करण्यात आली.जानेवारी 2015 मध्ये सातारा, सांगलीचे संपर्क प्रमुख, मे 2015 सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक झाले.सप्टेंबर 2017 ला रयत शिक्षण संस्थेच्या जनरल बॉडीवर सदस्य म्हणून निवड झाली.15 नोव्हेंबर 2019 ला राष्ट्रवादीचे कामगार विभागाचे उपप्रदेशाध्यक्ष, नवी मुंबई शहर प्रभारी म्हणून निवड झाली.तर सामाजिक कार्याची नोंदीची भली मोठी आहे. त्यांच्या उमेदवारीचा अर्ज आज विधानभवनात दाखल करण्यात आला.