प्रतिनिधी / कोल्हापूर
विधी अभ्यासक्रमाच्या परीक्षा विभागामध्ये अनागोंदी कारभार सुरू आहे. विधी शाखेची परिक्षा मराठीमध्ये घेण्यास विद्यापीठाच्या अधिकार मंडळाने मान्यता दिलेली आहे. मात्र तरीही विधी शाखेचे अभ्यास मंडळाचे अध्यक्ष डॉ. नारायण यांनी जाणीवपूर्वक मराठी भाषेतुन परिक्षा होण्यास विरोध केला आहे. विधीशाखेचे येणारे सर्व पेपर मराठीतून घ्यावे अन्यथा मनसे स्टाईलने आंदोलन करण्याचा इशारा यावेळी देण्यात आला. या मागणीचे निवेदन प्र. कुलगुरू डॉ. डी. टी. शिर्के, कुलसचिव विलास डॉ. विलास नांदवडेकर यांना देण्यात आले.
3 जूलै 2019 च्या पत्राप्रमाणे मानवविज्ञान शाखे अंतर्गत येणाऱया विधी अभ्यासक्रमाअंतर्गत एल. एल. बी. (3 व 5) अभ्यासक्रमाचे प्रश्न पत्रिका व उत्तर लिहीण्याचे माध्यम मराठी व इंग्रजी अशा दोन भाषांमध्ये सोडविण्यास मान्यता दिली आहे. मात्र विधी शाखेच्या अभ्यास मंडळाचे अध्यक्ष डॉ. नारायण यांनी यास जाणीवपुर्वक विरोध केला आहे. नारायण यांनी अधिकाराचा गैरवापर करून यास विरोध करण्यास सुरूवात केली आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी करण्यात यावी. दोषींवर तात्काळ कारवाई करावी. या प्रकरणामध्ये सहभागी असणाऱया परीक्षा विभागातील अधिकारी व कर्मचारी यांची चौकशी करून कडक कारवाई करावी. येणाऱया सर्व विधी शाखेचे पेपर मराठी भाषेमध्ये देण्यात यावे. मराठी भाषेतून अभ्यासक्रम सुरू केल्यासंदर्भात बार कौन्सिलची मान्यता घ्यावी अशा मागण्या निवेदनाद्वारे करण्यात आल्या आहेत.
यावेळी मनसे विद्यार्थी सेनेचे जिल्हाध्यक्ष अभिजित राउत, शहराध्यक्ष ऋतुराज माने, शहराध्यक्ष मंदार पाटील, अभिजीत पाटील, अमर ढेरे, प्रताप साळोखे, संतोष खटावकर, अमन मातदार, अजय पाटील, विनायक काकडे, रोहीत जाधव