गोकुळ शिरगाव /प्रतिनिधी
उजळाईवाडी तालुका करवीर येथे विनामास्क फिरणाऱ्या लोकांच्यावर गोकुळ शिरगाव पोलिसांचे कडून कारवाई करण्यात येत आहे.
उजळाईवाडी कोरोना दक्षात समिती यांच्यावतीने आज विनामास्क फिरणाऱ्यांना अडवून दंड वसूल केला जात आहे. यामध्ये गोकुळ शिरगाव पोलीस ठाण्याचे सपोनि सुशांत चव्हाण उजळाईवाडी सरपंच, उपसरपंच, सर्व सदस्य व कोरोना दक्षता समिती भाग घेऊन ही कारवाई करत आहेत. या कारवाईमुळे या परिसरात लोकांच्यावर चांगलाच वचक बसला असून सकाळपासून सर्वच लोक जागृत झाले असून दंडाच्या भीतीने मास्क लावून फिरत आहेत.