तुर्कस्तानमधील सर्वात मोठय़ा इस्तंबुल विमानतळाने आंतरराष्ट्रीय प्रवाशांसाठी स्वतःच्या पहिल्या कोविड-19 चाचणी केंद्राचे उद्घाटन केले आहे. टर्मिनलवरील प्रयोगशाळांमध्ये स्वॅब नमुन्यांची चाचणी केली जाणार आहे. तसेच 110 लोकांच्या चाचणीचा अहवाल 2 तासांमध्ये प्राप्त होणार आहे. विमानतळावर दाखल होणाऱया आणि बाहेर पडणाऱया प्रवाशांसाठी प्रतिदिन 40 हजार चाचण्या करण्याची क्षमता आहे. दोन महिन्यांपेक्षा अधिक काळापर्यंत महामारीमुळे बंद राहिलेले विमानसेवा पुन्हा सुरू करण्यात आली आहे.
पाकिस्तान : 4,339 रुग्ण
पाकिस्तानात मागील 24 तासांमध्ये कोरोनाचे 4,339 नवे रुग्ण सापडले आहेत. तर दिवसभरात 78 जणांचा मृत्यू झाला आहे. देशाच्या आरोग्य मंत्रालयानुसार 2,17,809 बाधित आढळून आले आहेत. तर 4,473 जणांचा कोरोनामुळे बळी गेला आहे. एकूण 2,723 रुग्णांची प्रकृती गंभीर आहे. तर आतापर्यंत 1,04694 बाधित या संसर्गातून बरे झाले आहेत. देशात सिंध प्रांतात सर्वाधिक रुग्ण सापडले आहेत.