वाढीसोबत 18,953 कोटी रुपयावर : विमा नियामक प्राधिकरणाची आकडेवारी
नवी दिल्ली
साधारण विमा कंपन्यांचे सकल प्रत्यक्ष लिखित प्रिमियम उत्पन्न डिसेंबर 2021 मध्ये 7.3 टक्क्यांनी वाढून 18,953.09 कोटी रुपयांवर आले आहे. विमा क्षेत्रातील नियामक असणाऱया भारतीय विमा नियामक आणि विकास प्राधिकरण (इरडा) यांनी या संदर्भात आकडेवारी सादर केली आहे. एक वर्ष अगोदर डिसेंबर 2020 मध्ये साधारण विमा कंपन्यांचे सकल प्रिमियमरुपी उत्पन्न 17,662.32 कोटी रुपयावर राहिले होते.
यामध्ये डिसेंबर 2021 मध्ये देशात सक्रीय 24 सामान्य विमा कंपन्यांचे सकल प्रिमियम उत्पन्न 16,109.62 कोटी रुपये राहिले असून जे एक वर्षाच्या समान कालावधीत 15,463.51 कोटी रुपयापेक्षा 4.2 टक्के अधिक राहिले आहे. प्राप्त अहवालानुसार पाच आरोग्य विमा कंपन्यांनी डिसेंबर 2021 मध्ये सकल प्रिमियम उत्पन्न हं 1,740.15 कोटी रुपये राहिले असून जे डिसेंबर 2020 च्या 1,325.03 कोटी रुपयाच्या तुलनेत 31.3 टक्के अधिक राहिले आहे.
दोन विशेष सार्वजनिक क्षेत्रातील विमा कंपन्या भारतीय कृषी विमा कंपनी आणि ईसीजीसी लिमिटेडच्या सकल प्रिमियम उत्पन्नामध्ये मागील महिन्यात 26.3 टक्क्यांनी वाढ झाली आहे. ते एक वर्षाअगोदर 873.78 कोटी रुपयांनी वाढून 1,103.33 कोटी रुपये राहिले होते.
काहीशी स्थिती
साधारण विमा क्षेत्रातील सर्व 31 कंपन्यांचे सकल प्रिमियम उत्पन्न एप्रिल-डिसेंबर 2021 च्या दरम्यान 1,61,081.60 कोटी रुपये राहिले. जे एक वर्षाच्या अगोदर समान कालावधीत 1,44,879.54 कोटी रुपयाच्या तुलनेत 11.18 टक्के अधिक राहिले आहे. एकंदरच विमा कंपन्यांची कामगिरी ही काहीशी समाधानकारक राहिली असल्याचे समजते.