प्रतिनिधी / सुमित तांबेकर
डिचोलीमतदार संघातील भाजपचे उमेदवार सभापती राजेश पाटणेकर यांच्या डिचोली येथील प्रचार कार्यालयाचे उद्घाटन झाले. हे उद्धाटन महाराष्ट्राचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते पार पडले, यावेळी विरोधकांना गोव्याच्या विकासापेक्षा भाजपला पराभूत करणे महत्त्वाचं वाटतं असे ते म्हणाले. राजेश पाटणेकर यांनी आपल्या मतदारसंघात चांगला विकास केला आहे. तसेच गेल्या पाच वर्षात अनेक प्रकल्प पुर्ण केले आहेत. त्यामूळे अशीच विकास कामे करण्यासाठी भाजपला मतदान करा असे अवाहन त्यांनी उमेवारांना केले.
विरोधकांना गोव्याचा विकास करावा यापेक्षा भारतीय जनता पक्षाला पराभुत करणे महत्त्वाचे वाटत असल्याचे सांगताना महाराष्ट्रवादी गोमंतक पक्ष जो गोव्यातील स्थानिक असुन ही तृणमुल काँग्रेसने त्यांना पैशाच्या जोरावर गुंडाळल्याचे फडणवीस यावेळी म्हणाले. मात्र टीएमसीला गोवेकरांनी नाकारेले असल्याने मगोची मोठी अडचण झाली आहे. असे ते यावेळी म्हणाले. तसेच गोव्यातील काही नेते पक्षांतराच्या मुद्याकडे लक्ष वेधत फडणवीस यांनी काही राजकिय नेते व्यक्तीगत स्वार्थासाठी कोलांडउड्या मारत असुन गोव्याची जनता त्यांना त्यांची जागा दाखवेल असे ते यावेळी म्हणाले.
गोव्याचा विकास अधिक वेगाने करु – डॉ. प्रमोद सावंत
यावेळी बोलताना गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी गेल्या काही वर्षात आपण वेगाने विकास कामे मार्गी लावली आहेत. यामध्ये डिचोली पोलीस स्थानक, डिचोली प्रशासकिय इमारत, डिचोली शहर विकास कार्यक्रम आदि विकास कामे मार्गी लावली असून अजुन विकास करण्याची संधी डिचोलीकरांनी सभापती पाटणेकर यांच्या रुपाने भाजपला पुन्हा द्यावी अशी विनंती सावंत यांनी केली.यावेळी डिचोली मतदारसंघाचे भाजप उमेदवार राजेश पाटणेकर, भाजप प्रवक्ते केशव उपाध्ये, महाराष्ट्राचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.