मुंबई/प्रतिनिधी
कोरोनाबरोबरच आता ब्लॅक फंगस अर्थात म्युकरमायकोसिसने सर्वांची डोकेुदुखी वाढवली आहे. आता शिवसेनेचा नेते आणि राज्यसभेतील खासदार संजय राऊत यांनी राज्य सरकारवर वारंवार टीका करणाऱ्या विरोधकांना ब्लॅक फंगस असे म्हंटले आहे.
राज्यात वेगाने वाढत असलेल्या म्युकरमायकोसिस या आजारावर केंद्रानं चिंता व्यक्त केली असून, साथरोगांच्या कायद्यातही याचा समावेश करण्यात आला आहे. सर्वांच्या चिंतेत भर टाकणाऱ्या या ब्लॅक फंगसची (म्युकरमायकोसिस) उपमा शिवसेनेचे नेते आणि राज्यसभेतील खासदार संजय राऊत यांनी राज्यातील विरोधकांना (भाजप) दिली आहे. पुण्यात कोरोनाचा संसर्ग झालेल्या बालकांसाठी सुरू करण्यात आलेल्या सेंटरचे उद्घाटन संजय राऊत यांच्या हस्ते करण्यात आलं. यावेळी बोलताना त्यांनी भाजपावर निशाणा साधत शिवसैनिकांना सल्ला दिला.
मुंबईतील कोरोना रुग्णांचा प्रमाण कमी होत आहे. कोरोना महामारीच्या काळात मुंबईतील चांगल्या कामाची जागतिक आरोग्य संघटना, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह अनेकजणांनी दखल घेत या कामाचे विशेष कौतुक केले आहे, मात्र एवढं चांगलं काम करूनही विरोधक राज्यसरकरवर टीका करत आहेत. त्यामुळे शिवसैनिकांनी असल्या टीकेकडे दुर्लक्ष करून कामावर लक्ष द्यावे, कारण विरोधक ब्लॅक फंगस (म्युकरमायकोसिस) आहेत,” अशा शब्दात शिवसेनेचे नेते खासदार संजय राऊत यांनी भाजपाच्या नेत्यांवर निशाणा साधला. तसेच शिवसैनिकांनी सकारात्मक राहून कामकरावे , असा सल्लाही त्यांनी यावेळी दिला.