प्रतिनिधी / सांगरूळ
सांगरूळ शिक्षण संस्थेचे अध्यक्ष यशवंत लहुजी खाडे यांचे नातू व स. ब. खाडे महाविद्यालयातील लिपिक बाबासो खाडे यांचे सुपुत्र चि. संदीप यांचा विवाह सांगरुळ येथील श्री. विवेकानंद चाबूक यांची कन्या, चि.सौ.कां. भक्ती हिच्याशी संपन्न झाला.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मोजक्याच कुटुंबातील सदस्य सोबत आनंदाचे क्षण साजरे करत असताना खाडे-चाबूक कुटुंबीयांनी सामाजिक संवेदनशील मनाचे भान ठेवत गरजू मुलांच्या शैक्षणिक मदतीसाठी रोख रकमेचा निधी उमेद फौंडेशनला सुपूर्द करत कोरोना विषाणूच्या संसर्गाच्या काळात वंचितांच्या मदतीसाठी कार्यरत असणाऱ्या उमेद फाउंडेशनच्या कार्याला मदत केली आहे.
यावेळी यशवंत खाडे, बाबासो खाडे, विवेकानंद चाबूक, अक्षय चाबूक व नवविवाहीत दांपत्याच्या हस्ते उमेद फौंडेशनचे सदस्य प्रा. एस. पी. चौगले, प्रकाश गाताडे, किशोर भोसले यांनी हा निधी स्वीकारला. यावेळी प्रा. आर. एन. पाटील, प्रा. डॉ. अभिजित वणीरे व मान्यवर मंडळी उपस्थित होते.