प्रतिनिधी/ बेळगाव
हेस्कॉमने दुरुस्तीचे काम हाती घेतले असल्याने रविवार दि. 11 रोजी सकाळी 10 ते दुपारी 4 पर्यंत वीजपुरवठा खंडित होणार आहे. शहरातील उपनगरांसह ग्रामीण भागामध्येही वीजपुरवठा बंद राहणार आहे, अशी माहिती हेस्कॉमने दिली आहे.
बेळगाव तालुक्मयातील येळ्ळूर, धामणे, कुरबरहट्टी, मासगौंडहट्टी, देवगणहट्टी, यरमाळ, सुळगा, नंदिहळ्ळी, देसूर, राजहंसगड या गावांतील वीजपुरवठा खंडित होणार आहे. बेळगाव शहरातील आणि खानापूर तालुक्मयातील काही गावांमधीलही वीजपुरवठा बंद राहणार असल्याचे हेस्कॉमने कळविले आहे.