बिग बॉस मराठीचं तिसरं सिझन अंतिम टप्प्यात आलं असून नुकतंच घरात ‘तिकीट टू फिनाले’चा टास्क पार पडला. ज्यामध्ये मीरा जगन्नाथ, उत्कर्ष शिंदे आणि विशाल निकम यांचा समावेश होता. हे तिन्ही स्पर्धक मागील टास्कमध्ये ‘तिकीट टू फिनाले’ खेळण्यासाठी पात्र ठरले होते. या टास्कनुसार तिघांना खुर्चीवर बसून एकाग्र होऊन 33 मिनिटं मोजावी लागतील. तर इतर स्पर्धकांना त्यांचं लक्ष विचलित करायचं होतं. 33 मिनिटं झाल्यानंतर त्यांना बेल वाजवावी लागेल आणि एक स्पर्धक जो सर्वांत जवळ असेल किंवा अचूक मिनिटं मोजेल तो ‘तिकीट टू फिनाले’ जिंकणारा पहिला स्पर्धक असेल आणि थेट अंतिम फेरीत जाईल. विशेष म्हणजे यापैकी कोणाच्याही समोर घडय़ाळ नव्हतं आणि त्यांना आपली रणनीती वापरून मिनिटं मोजावी लागली. विशाल निकम 33 मिनिटांच्या सर्वात जवळ असल्याने तो ‘तिकीट टू फिनाले’चा विजेता ठरला. बिग बॉस मराठी थ्रीचा पहिला फायनलिस्ट बनल्याबद्दल बिग बॉसने विशालचं अभिनंदन केलं. विशाल या तिकीटाने नक्कीच खुश आहे. दख्खनचा राजा जोतिबा या मालिकेत विशालने साकारलेली जोतिबाची भूमिका गाजली होती. कोरोना लॉकडाऊनमुळे मालिकांच्या शूटिंगचे पॅकअप झाले त्या काळात ही मालिका थांबवण्याचा निर्णय निर्मात्यांनी घेतल्याने विशालचा छोटय़ा पडदद्यावरचा प्रवास थांबला होता. आता बिगबॉसच्या निमित्ताने विशाल त्याच्या चाहत्यांसमोर आला आहे.
Previous Articleथंडीत वाढतो हृदयविकाराचा धोका
Next Article कबड्डीपटू अजय शिंदेंचा अपघातात जागीच मृत्यू
Tarun Bharat Portal
Parasharam Patil is a versatile content writer, scriptwriter, and content producer at Tarun Bharat Media. Specializes in editorial news, local news entertainment, and political content. His captivating storytelling and deep industry knowledge make him an expert in crafting engaging narratives.