वृत्तसंस्था/ सिडनी
येत्या नोव्हेंबर-डिसेंबर दरम्यान आंतरराष्ट्रीय हॉकी फेडरेशनतर्फे कनिष्ठांची विश्वचषक पुरुषांची हॉफी स्पर्धा भारतामध्ये भरविली जाणार आहे. दरम्यान, या स्पर्धेचे भारतातील ठिकाणे अद्याप निश्चित करण्यात आलेले नाही. कोरोना महामारी समस्येमुळे भारतीय शासनाच्या प्रवास नियमांचे पालन सक्तीचे असल्याने आस्ट्रेलियाने या स्पर्धेतून माघार घेतली आहे.
टोकियो ऑलिम्पिक स्पर्धेत ऑस्टेलियाच्या पुरुष हॉकी संघाला रौप्य पदकावर समाधान मानावे लागले होते. पुढील महिन्यात होणाऱया प्रो-लीग हॉकी स्पर्धेच्या तिसऱया हंगामातून न्यूझीलंडने याच कारणास्तव माघार घेतली आहे. 2021 ऑक्टोबरमध्ये भारतात प्रो-लीग हॉकी स्पर्धेच्या तिसऱया हंगामाला प्रारंभ होत आहे. या दोन्ही स्पर्धांमध्ये विविध देशांचे संघ भारतात दाखल झाल्यानंतर त्यांना सक्तीचे विलगीकरण ठेवण्याचा निर्णय भारतीय शासनाने घेतला आहे. या नियमांच्या कडक अंमलबजावणीमुळे न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलिया यांनी माघारीचा निर्णय जाहीर केला. चालू वर्ष अखेरीस दक्षिण अफ्रिकेत कनिष्ठ महिलांची विश्वचषक हॉकी स्पर्धा आयोजित केली आहे. ऑस्ट्रेलियाने या स्पर्धेतूनही माघार घेतली आहे.