नाझर कॅम्प तलावात बंदी असल्याने मनपाची पाऊले
प्रतिनिधी/ बेळगाव
नाझर कॅम्प, वडगाव येथील पाण्याची विहीर कोसळल्याने शेजारी असलेल्या विसर्जन तलावात यंदा श्रीमूर्ती विसर्जनास बंदी घालण्यात आली आहे. मात्र पर्यायी व्यवस्था म्हणून फिरत्या वाहनांची व्यवस्था करण्यात आली होती. 11 व्या दिवशीच्या विसर्जनावेळी होणारी गैरसोय टाळण्यासाठी तलावाशेजारी सहा वाहनांची व्यवस्था करण्यात आली आहे. वडगाव परिसरातील रहिवासी जेल शाळेच्या आवारातील विहिरीमध्ये गणेश विसर्जन करीत असत. मात्र, विहिरीच्या पाण्याचा वापर पिण्यासाठी करण्यात येत असल्याने या ठिकाणी विसर्जनास बंदी घालण्यात आली होती. त्यामुळे पर्यायी व्यवस्था म्हणून वडगाव-नाझर कॅम्प येथील खुल्या जागेत विसर्जन तलाव निर्माण करून घरगुती व सार्वजनिक गणेशमूर्तींचे विसर्जन करण्यात येते. मात्र, मागील वषी पावसाळय़ात येथील विसर्जन तलावाशेजारी विहीर कोसळली आहे. तलावाशेजारील माती ढासळल्याने धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे यंदा या तलावात गणेश विसर्जनास बंदी घालण्यात आली आहे. या परिसरात गणेश विसर्जनाकरिता पर्यायी तलाव नसल्याने जुने बेळगाव येथील कलमेश्वर तलावाकडे धाव घेतात. त्यामुळे महापालिकेने पाचव्या दिवशी या ठिकाणी फिरत्या वाहनांची व्यवस्था विसर्जनासाठी केली होती. त्याला भाविकांतून उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. रात्र उशिरापर्यंत गणेश विसर्जन करण्यात आले. पण अकराव्या दिवशी विसर्जन करणाऱयांची संख्या मोठय़ा प्रमाणात असते. त्यामुळे भाविकांची गैरसोय होण्याची शक्मयता आहे. याचा विचार करून महापालिकेने 11 व्या दिवशीच्या विसर्जनाकरिता नाझर कॅम्प तलावाशेजारी फिरत्या वाहनांची व्यवस्था केली आहे. या परिसरात 6 वाहने थांबविण्यात येणार असून, घरगुती श्रीमूर्ती विसर्जनास सोयीचे होणार आहे. दुपारी 3 पासून रात्री उशिरापर्यंत विसर्जन करण्यात येणार आहे. केवळ वडगाव परिसरातील भाविकांच्या सुविधेसाठी ही व्यवस्था करण्यात आली आहे.