नदीकाठावर दरवषी 10 हॅलोजन दिव्यांची सुविधा
प्रतिनिधी /बेळगाव
सार्वजनिक आणि घरगुती गणेश विसर्जन हिंडलगा पंपिंग स्टेशनशेजारील नदीमध्ये करण्यात येत असल्याने रात्री उशिरापर्यंत गर्दी होते. त्यामुळे नागरिकांच्या सुविधेसाठी हॅलोजन दिव्यांची व्यवस्था करण्याची जबाबदारी गेल्या 15 वर्षांपासून संभाजी पिराजी चौगुले यांनी सांभाळली आहे. ते 15 वर्षांपासून ही सेवा मोफत देत असल्याने त्यांना भाविकांनी धन्यवाद दिले.
हिंडलगा, विजयनगर, गणेशपूर अशा विविध भागातील गणेशमूर्तींचे विसर्जन मार्कंडेय नदीमध्ये करण्यात येते. प्रारंभी ग्रामपंचायतकडून नदीकाठावर दिव्यांची व्यवस्था करण्यात येत होती. मात्र, नंतर ग्रा. पं.ने याकडे दुर्लक्ष केले, तेव्हापासून ग्रा. पं. कर्मचारी असलेले संभाजी चौगुले यांनी ही सेवा कायम सुरू ठेवली आहे. घरगुती आणि सार्वजनिक गणेशमूर्तींचे विसर्जन विहिरी आणि विविध तलावांमध्ये केले जात असे. पण घरगुती विहिरींची संख्या कमी असून पाणी दूषित होत असल्याने विहिरींमध्ये गणेश विसर्जन केले जात नाही. सर्व भाविक मार्कंडेय नदीमध्ये गणेश विसर्जन करण्यास प्राधान्य देतात. त्यामुळे विविध परिसरातील विसर्जन आंबेवाडी क्रॉसजवळ मार्कंडेय नदीमध्ये करण्यात येते. हिंडलगा, विजयनगर आणि गणेशपूर येथील 10 सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांच्या गणेशमूर्तींचे विसर्जनदेखील या ठिकाणी केले जाते. त्यामुळे रात्री उशिरापर्यंत विसर्जन चालते.
नदीच्या काठावर तसेच या रस्त्यावर मोठय़ा प्रमाणात गर्दी होते. अंधारामधून वाट काढत भाविकांना विसर्जन करावे लागते. त्यामुळे नदीकाठावर हॅलोजन दिवे लावण्यात येतात. हे दिवे लावण्याचे काम संभाजी चौगुले यांनी गेल्या 15 वर्षांपासून सुरू ठेवले आहे. ग्रा. पं. मध्ये पथदिपांची दुरुस्ती करणाऱया संभाजी चौगुले यांनी ही सेवा कायम सुरू ठेवली असून ग्रा. पं. अथवा कोणत्याही सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाकडून कोणताच मोबदला घेत नाहीत. गणरायांच्या भक्तीपोटी सलग 15 वर्षे ही सेवा मोफतपणे करतात. त्यामुळे संभाजी चौगुले यांना भाविकांनी धन्यवाद दिले.