प्रतिनिधी/ खेड
वेंगुर्लेचा 30 वर्षीय क्लिनर दीपक पुरूषोत्तम बांबरडेकर हा लोटे येथून बेपत्ता झाल्याची तक्रार टेम्पोचालक परशुराम केशव शेटय़े यांनी रविवारी येथील पोलीस स्थानकात दाखल केली आहे. ही घटना शनिवारी रात्री 12 ते रविवारी पहाटे 6 वाजण्याच्या सुमारास घडली.
मुंबईहून गोव्याकडे जाणारा एमएच 07, एजे 1107 क्रमांकाचा टाटा टेम्पो महामार्गावरील लोटेमाळ येथे आला असता झोप अनावर झाल्याने चालक परशुराम याने टेम्पो रस्त्याच्या बाजूला लावून दोघेजण टेम्पोच्या केबिनमध्ये झोपी गेले. पहाटे 6 वाजता पुढे मार्गस्थ होण्यासाठी चालक उठला असता त्यास क्लिनर दीपक कुठेही दिसून आला नाही. त्याचा सर्वत्र शोध घेऊनही त्याचा थांगपत्ता न लागल्याने चालकाने पोलीस स्थानक गाठत तक्रार दिली.