वेंगुर्ले/वार्ताहर-
महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचा बाारावीचा वेंगुर्ले तालुक्याचा निकाल 100 टक्के लागला आहे. तालुक्यात कै. सौ. गुलाबताई दीनानाथ नाईक कनिष्ठ महाविद्यालय वेतोरे या महाविद्यालयाची वाणिज्य शाखेची विद्यार्थिनी मनाली रामचंद्र कुबल हिने 583 गुण (97.17 टक्के) मिळवून प्रथम, बॅ. बाळासाहेब खर्डेकर वेंगुर्ले या महाविद्यालयाची या विज्ञान शाखेची विद्यार्थिनी सेजल न्यानेश्वर अणसूकर हिने 571 गुण (95.16 टक्के) मिळवून द्वितीय तर कै. सौ. गुलाबताई दीनानाथ नाईक काfनष्ठ महाविद्यालय वेतोरे या महाविद्यालयाची वाणिज्य शाखेची विद्यार्थिनी वैष्णवी शिवराम वराडकर हिने 564 गुणांसह तृतीय क्रमांक पटकाविला आहे.