वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
वर्ष 2050 पर्यंत कार्बन उत्सर्जन शून्य करण्याच्या दिशेने आपली योजना आखत असताना वेदान्ताने कार्बन उत्सर्जन असणारा हरित ऍल्यूमिनिअम ब्रँड ‘रेस्टोरा’चे सादरीकरण केले आहे. कंपनी रेस्टोरा ब्रँडच्या अंतर्गत दोन उत्पादने लाइनो रेस्टोरा (कमी कार्बन उत्सर्जन ऍल्यूमिनिअम) आणि रेस्टोरा अल्ट्रा (अत्यंत कमी कार्बन उत्सर्जन ऍल्यूमिनिअम) मध्ये उतरवणार आहे.
वेदान्ता लिमिटेडचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहूल शर्मा यांनी यावर म्हटले आहे, की वर्ष 2050 पर्यंत आम्ही शून्य कार्बन उत्सर्जन असणारी कंपनी बनणार आहे. तसेच रेस्टोरा ब्रँड सादर करण्यासोबतच वेदान्ता कमी कार्बन उत्सर्जन असणाऱया ऍल्यूमिनिअमची तेजीने वाढत जाणारी जागतिक मागणी पूर्ण करण्यावर भर देणार असल्याचीही माहिती आहे.