प्रतिनिधी /वास्को
वेर्णा औद्योगिक वसाहतीत कार दरीत कोसळल्याने त्या कारने पेट घेण्याची घटना घडली. या अपघातात वास्कोतील प्रज्योत नाईक(21) हा युवक जखमी झाला. त्याला हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. आग विझवीण्यासाठी अग्नीशामक दलाला धाव घ्यावी लागली. मात्र, कार जळून खाक झाली.
शुक्रवारी सकाळी दहाच्या सुमारास वेर्णा औद्योगिक वसाहत परीसरात ही घटना घडली. चालक प्रज्योत नाईक याचे व्हॅगनर कारवरील नियंत्रण गेल्याने ही कार उंचावरून खाली कोसळली. ही खाली कोसळताच कारने पेट घेतला. मात्र, चालकाने लागेच त्या कारमधून बाहेर पडण्यास यश मिळवल्याने तो जखमांवर बचावला. त्या हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलेले आहे. अग्नीशामक दलाने घटना स्थळी धाव घेऊन बचाव कार्य केले. मात्र, कार आधीच खाक झाली होती.