तालुक्यात नव्याने बाधित, सक्रिय रुग्ण नाही : जिल्हय़ात तीन दिवस मृत्यूसंख्या शून्य : नव्याने सहा कोरोनाबाधित 51,534 रुग्ण कोरोनामुक्त
प्रतिनिधी / सिंधुदुर्गनगरी:
सिंधुदुर्ग जिल्हय़ात कोरोना रुग्णसंख्या आटोक्मयात आली असून वैभववाडी तालुक्मयात तर नव्याने एकही रुग्ण आढळलेला नाही किंवा कोरोनाबाधित एकही सक्रिय रुग्ण नाही. त्यामुळे वैभववाडी तालुका कोरोनामुक्त झाला आहे. दरम्यान, बुधवारी जिल्हाभरात फक्त सहा नव्याने कोरोना बाधित रुग्ण आढळले. तर गेल्या तीन दिवसात एकाही रुग्णाचा मृत्यू झालेला नाही.
जिल्हय़ात आतापर्यंत कोरोनाने एक हजार 455 जणांचा मृत्यू झाला आहे. तर नव्याने सहा कोरोना बाधित रुग्ण आढळल्याने कोरोना रुग्णांची एकूण संख्या 53 हजार 93 झाली आहे. जिल्हय़ात बरे झालेल्या 14 रुग्णांना डिस्चार्ज दिला गेल्याने आतापर्यंत 51 हजार 534 रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत.
जिल्हय़ात आता 112 सक्रिय रुग्णांवर उपचार सुरू असून त्यातील 17 रुग्णांची प्रकृती चिंताजनक आहे. पैकी 14 रुग्ण ऑक्सिजनवर, तर तीन रुग्ण व्हेंटिलेटरवर उपचार घेत असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. श्रीपाद पाटील यांनी दिली.
सिंधुदुर्ग जिल्हय़ातील सद्यस्थिती
बुधवारचे नवीन पॉझिटिव्ह रुग्ण सहा, सद्यस्थितीतील सक्रिय रुग्ण 112, सद्यस्थितीत उपचारासाठी जिल्हय़ाबाहेर गेलेले रुग्ण दोन, आज अखेर बरे झालेले रुग्ण 51,534, बुधवारअखेर मृत झालेले एकूण रुग्ण 1,455, बुधवारी दुपारी संपलेल्या 24 तासात मृत झालेले रुग्ण शून्य, आजपर्यंतचे एकूण पॉझिटिव्ह रुग्ण 53,093.
तालुकानिहाय आजचे पॉझिटिव्ह रुग्ण
कणकवली – एक, कुडाळ – एक, देवगड – एक, दोडामार्ग – दोन, जिल्हय़ाबाहेरील – एक.
तालुकानिहाय एकूण पॉझिटिव्ह रुग्ण
देवगड – 6539, दोडामार्ग – 2788, कणकवली – 10,000, कुडाळ – 10949, मालवण – 7794, सावंतवाडी – 7667, वैभववाडी – 2395, वेंगुर्ले – 4704, जिल्हय़ाबाहेरील – 257.
तालुकानिहाय सक्रिय रुग्ण
देवगड – 10, दोडामार्ग – नऊ, कणकवली – 30, कुडाळ – 21, मालवण – 13, सावंतवाडी – 14, वेंगुर्ले – सहा, जिल्हय़ाबाहेरील – एक.
तालुकानिहाय बुधवारपर्यंतचे मृत्यू
देवगड – 179, दोडामार्ग – 43, कणकवली – 297, कुडाळ – 243, मालवण – 288, सावंतवाडी – 203, वैभववाडी – 82, वेंगुर्ले – 111, जिल्हय़ाबाहेरील – नऊ.
आरटीपीसीआर आणि ट्रुनॅट टेस्ट रिपोर्टस्
तपासलेले नमुने : बुधवारी 791, एकूण 3,09,331 पैकी पॉझिटिव्ह आलेले नमुने 38,005.
ऍन्टिजन टेस्ट
तपासलेले नमुने : बुधवारी 158, एकूण 2,81,726. पैकी पॉझिटिव्ह आलेले नमुने 15,552.