लॉक डाउनच्या काळात सगळी क्रिएटिव्हिटी पणाला लावून उत्तम शॉर्ट फिल्म अथवा डॉक्युमेंटरी बनवली आहे का? नसेल बनवली तर लगेच तयारीला लागण्याचे आणि लवकरात लवकर तुमच्या फिल्म्स व्हायरस मराठीला पाठविण्याचे आवाहन करण्यात आले आहे. या काळात खूप तरुण फिल्ममेकर्स वेगळा विचार करून चांगल्या फिल्म्स बनवत आहेत त्यांच्यासाठी आणि या वेळाचा चांगला उपयोग करत काही जण अगदी मोबाईलवर सुद्धा चांगले माहितीपट आणि शॉर्ट फिल्म्स बनवत आहेत, त्यांच्यासाठी व्हायरस मराठीने हा उपक्रम आखला आहे.
या आगळ्या वेगळ्या डिजिटल फिल्म फेस्टिव्हल मध्ये शॉर्ट फिल्म आणि डॉक्युमेंटरी दोन्ही विभागात प्रत्येकी तीन पारितोषिकं दिली जाणार आहेत ,प्रथम पारितोषिक 7 हजार 500 रुपये, द्वितीय पारितोषिक 5 हजार आणि तफतीय पारितोषिक 3 हजार आहे. या लॉकडाऊन फिल्म फेस्टिव्हलचे परीक्षक म्हणून लेखक अरविंद जगताप, अभिनेत्री सोनाली कुलकर्णी, दिग्दर्शक संतोष कोल्हे आणि दिग्दर्शक समीर पाटील हे काम पाहणार आहेत. निवड केलेल्या सर्वोत्कृष्ट दहा फिल्म्स व्हायरस मराठीच्या युटय़ुब चॅनेलवर प्रदर्शित केल्या जातील आणि सर्व पुरस्कार विजेत्या फिल्म मेकर्स ना लॉकडाउन नंतर व्हायरस मराठीसोबत काम करायची संधी मिळणार आहे. फिल्म लॉक डाउनचे सगळे नियम पाळून शूट केलेली असावी, टेक्निकल स्पेसिफिकेशनची अट नाही, मोबाईलवर शूट केलेली असली तरी चालेल पण क्वालिटी उत्तम हवी.नीट एडिट केलेली असावी, अशी विनंती व्हायरस मराठीने केली आहे. या फेस्टिव्हलमध्ये सहभागी होणाऱया फिल्म्स ना विषयाचे बंधन नाही आणि वेळेचंही बंधन नाही. या फेस्टिव्हलमध्ये सहभागी होण्यासाठी, एन्ट्री फॉर्म व्हायरस मराठीच्या फेसबुक पेजवर उपलब्ध आहेत. 12 मेपर्यंत चित्रपट पाठविण्याचे आवाहन करण्यात आले आहे. फेस्टिव्हलमध्ये सहभागी होण्यासाठी संपर्क – आशुतोष- 9833077857 , दिशा – 9867081530 तसेच Email- vmffest@gmail.com