सध्या कोरोना विषाणूच्या वाढत्या प्रभावामुळे आपल्या जीवनशैलीत आमूलाग्र बदल झाले आहेत. अशावेळी या विलक्षण संकटाचा परिणाम म्हणून आपण निर्णायक क्षणाचा अनुभव घेत आहोत. अशावेळी मनात असलेली आशा आपल्याला विवेक आणि दिलासा देते. कलर्सने गुंजच्या सहयोगाने त्यांच्या प्रमुख कलाकारांच्या सादरीकरणातून एक व्हिडिओ कॅम्पेन सुरू केले आहे.
हम होंगे कामयाब (आम्ही मात करू) या आपल्या प्रेरणादायी
हृदयस्पर्शी गाण्याद्वारे, छोटी सरदारनी, नागीण भाग्य का जहरीला खेल, विद्या, पवित्र भाग्य, शक्ती… अस्तित्व
के एहसास की, शुभारंभ, बॅरिस्टर बाबू आणि
नाटी पिंकी या कलर्स वाहनीवरील मालिकांमधील कलाकार आपल्याला आशा सोडू नका असे प्रोत्साहन
देत आहेत आणि गरजू व्यक्तींच्या कल्याणासाठी देणगी देण्याचे आणि प्रत्येकाला मदत करण्याचे
आवाहन करत आहेत. वायकॉम 18 च्या हिंदी मास
एंटरटेनमेंटच्या चिफ कंटेंट ऑफिसर मनीषा शर्मा म्हणाल्या,
लॉकडाऊनने आपल्या जीवनावर खूप मोठा परिणाम केला आहे. आपण सर्वजण केव्हा एकदा सर्वकाही व्यवस्थित
होते आहे याची आतुरतेने वाट पहात आहोत आणि ते थांबेल अशी आशा करत आहोत. हम होंगे कामयाब हे गाणे आपल्या आताच्या भावना व्यक्त करत आहे आणि सकारात्मकतेची
भावना जागफत करत आहे. आपण सर्वजण या काळात एकत्र आहोत याची आठवण
प्रेक्षकांना या व्हिडिओतून करून देण्याचा आमचा प्रयत्न आहे.
आपण आता जरी या कठीण काळातून जात असलो तरी भविष्य उज्ज्वल असणार आहे आणि अजून बळकट आणि धाडसी होण्यासाठी आपण ही साखळी तोडणार आहोत असे या व्हिडिओतून दाखविण्यात आले आहे.