एका अहवालामधून माहिती सादर- कोरोनाच्या प्रभावानंतर ऑनलाईन गेमला सर्वाधिक पसंती
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
मागील काही दिवसांपासून गेम विषयी भारतीयांचा कल वेगाने वाढतो आहे. यामध्ये अन्य प्रतिस्पर्ध्यांनाही भारतीयांनी मागे टाकले असल्याचे एका अहवालामधून समोर आले आहे. भारतीय गेमर्स प्रति सप्ताहात व्हिडीओ गेम खेळण्यामध्ये साधारणपणे साठे आठ तास इतका कालावधी खर्च करत असून ज्यामध्ये 60 टक्क्यांपेक्षा अधिकजण सलग तीन तास गेमसाठी खर्च करत असल्याचा अहवालात दावा केला आहे.
लाइमलाइट नेटवर्क्स एक व्हिडीओ डिलीवरी आणि एज क्लाउड सर्व्हिसेज प्रोव्हायडरने आपल्या अहवालामध्ये सांगितले आहे. की गेम खेळणारे गेमर्स प्रति सप्ताह साधारणपणे जास्तित जास्त आठ तास आणि कमीत कमी 27 मिनिटापर्यंत व्हिडीओ गेम खेळले जात आहे.
उपलब्ध आकडेवारीनुसार व्हिडीओ गेम खेळणाऱया जगभरामध्ये एक वातावरण निर्माण होत आहे. ज्यामध्ये कंझ्युमर प्लेइंग टाइम मागील वर्षाच्या तुलनेत 14 टक्क्यांनी अधिक आहे. महामारीच्या दरम्यान टाळेबंदीमुळे अत्यावश्यक सेवा वगळून अन्य क्षेत्र बंद राहिली होती. यामुळे मनोरंजन आणि ऑनलाईन गेमिंगची कमी कालवधीत वेगाने लोकप्रियेता वाढत गेल्याचा हा परिणाम असल्याची नोंद करण्यात आली आहे.
ऑनलाईन गेमच्या मदतीने नवे मित्र
निम्म्याहून अधिक गेमर्सनी दिलेल्या माहितीनुसार मागील वर्षात ऑनलाईन गेमच्या माध्यमातून नवीन मित्र बनविण्याचा टेंड निर्माण झाला आहे. तर तीनमधील एकाने म्हटल्याप्रमाणे अन्य खेळाडूसोबत बातचीत करण्याची क्षमता महत्वपूर्ण असल्याचे स्पष्ट केले आहे.
64 टक्के गेमर्सचा प्रारंभ मागील वर्षी
व्हिडीओ गेमचा स्विकार करण्यासाठी इंटरेक्टिविट आणि सोशल ऍटेचमेंटच्या प्रभावामुळे मागील वर्षी जवळपास 64 टक्के लोकांनी गेम खेळण्यास प्रारंभ केला असल्याचे सदर अहवालामधून सांगितले आहे.