प्रतिनिधी / बेळगाव
बेळगाव लोकसभेची पोटनिवडणूक होणार असल्याने निवडणूक अधिकाऱयांकडून नागरिकांना व्हीव्हीपॅट विषयी माहिती देण्यात येत आहे. शुक्रवारी शहरात येणाऱया-जाणाऱया नागरिकांना या विषयी माहिती देण्यात येत होती. व्हीव्हीपॅट विषयी नागरिकांच्या मनामध्ये अनेक गैरसमज आहेत ते दूर करण्यासाठी निवडणूक आयोगाकडून जागृती करण्यात येते.
सेक्टर अधिकारी डॉ. राजशेखर चलगेरी व प्रशिक्षक सी. ए. गोरगौंडा यांच्या नेतृत्वाखाली नागरिकांना मार्गदर्शन करण्यात आले. आपण एव्हीएम मशीनवर बटण दाबल्यानंतर कोणाला मतदान होते ते व्हीव्हीपॅट मशीनमधील रिसीटवरून समजून येते. यामुळे केलेले मतदान इतरांना जात नसल्याची शाश्वती यामुळे नागरिकांना मिळत आहे. बेळगाव शहरात विविध ठिकाणी अशा पद्धतीने शुक्रवारी व्हीव्हीपॅट विषयी माहिती देऊन जागृती कार्यक्रम राबविण्यात
आला.