प्रतिनिधी / खानापूर
कर्नाटक राज्याचे माजी मंत्री आर. व्ही. देशपांडे संचलित कै. विश्वनाथ आर. देशपांडे मेमोरियल ट्रस्टच्यावतीने गुरुवारी खानापूर, कित्तूर, बैलहोंगल येथे ‘डॉक्टर्स डे’ चे आयोजन करण्यात आले होते. या निमित्त खानापूर येथे झालेल्या कार्यक्रमात तालुक्यातील सर्व सरकारी डॉक्टर्स, नर्स यांचा सन्मान करण्यात आला.
प्रारंभी खानापूर ब्लॉक काँग्रेसचे अध्यक्ष महादेव कोळी यांनी स्वागत करुन कार्यक्रमाचा उद्देश विशद केला. यावेळी केक कापून कोरोनाकाळात डॉक्टर्स, नर्स व त्यांच्या सहकाऱयांनी बजावलेल्या सेवेबद्दल त्यांना धन्यवाद देण्यात आले. यावेळी कै. विश्वनाथ आर. देशपांडे मेमोरियल ट्रस्टच्यावतीने प्रत्येक डॉक्टर्स, नर्स यांना सन्मान पत्र व किटसचे वितरण करण्यात आले. यावेळी तालुका आरोग्य अधिकारी डॉ. संजय नांद्रे यांनी ‘डॉक्टर्स डे’ विषयी आपले मनोगत व्यक्त करून कै. विश्वनाथ देशपांडे मेमोरियल ट्रस्टने केलेल्या सन्मानाबद्दल माजी मंत्री आर. व्ही. देशपांडे यांना धन्यवाद
दिले.
यावेळी देशपांडे मेमोरियल ट्रस्टचे प्रतिनिधी संतोष परीट, महेश मुसळळी, नगराध्यक्ष मजहर खानापुरी, नगरसेवक तोईद चांदकन्नावर, प्रकाश बैलूरकर तसेच प्रकाश देशपांडे, किरण कोडोळी, गुड्डूसाब टेकडी यासह तालुक्यातील सरकारी डॉक्टर्स, नर्स, वैद्यकीय कर्मचारी व इतर उपस्थित होते.