प्रतिनिधी / कोल्हापूर
रत्नागिरी जिल्हÎातील कासे गाव.. चौदा वर्षीय मुलाला रात्री झोपेतच सर्पदंश झाला, तो लघुशंकेला जाताच चक्कर येऊन पडला. स्थानिक डॉक्टरांनी 1 दिवस आयसीयूत ठेवले, निदान न झाल्याने त्याला सीपीआरमध्ये दाखल केले. तीन दिवस व्हेंटिलेटरवर ठेवल्यानंतर निदान सापडेना, अखेरीस त्याच्या संपुर्ण शरीराची तपासणी केली, अन् पायाच्या बोटांवर चावल्याच्या खुणा दिसल्या. त्यानंतर सर्पदशांवरील उपचार सुरू झाले, अन् मृत्यूच्या दाढेतून या मुलाला सीपीआरच्या वैद्यकीय पथकाने परत आणले. मंगळवारी त्याला डिसचार्ज मिळाला.
खेड तालुक्यातील कासे येथील 14 वर्षीय अरमान महंमद चौगुले.. त्याने 5 जानेवारीला रात्री जेवण केल्यानंतर घरी गेला, अन् लघुशंकेला जाताच चक्कर येऊन बेशुद्ध पडला, त्याच्या तोंडाला फेस आला होता, पालकांनी त्याला स्थानिक डॉक्टरांना दाखवले. त्याचे शरीर काळे-निळे पडू लागले. चिपळूण येथील खासगी हॉस्पिटलमध्येही दाखवले. तेथे सर्व तपासण्या करून त्याला अतिदक्षता विभागात व्हेंटिलेंटरवर 24 तास ठेवले, अखेरीस निदान लागेना म्हणून त्याला उपचारार्थ सीपीआर हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले.
सीपीआर हॉस्पिटलमध्ये 3 दिवस अरमान व्हेंटिलेटरवर होता. त्याचे सर्व स्नायू, श्वासोच्छश्वासाचे स्नायू कमजोर पडले होते. त्याला विषबाधा, सर्पदंश अन् गंभीर आजार आहे का, यासाठी कसून तपासण्या करण्यात आल्या. तरीही प्रारंभी काहीच निदान लागले नाही. अखेरीस रूग्णाच्या अंगावरील कपडे बाजूला केले. संपुर्ण शरीराची तपासणी केली, त्यात अरमानच्या तळपायावर बोटांखाली टोचलेल्या दोन खुणा दिसून आल्या, अन् सर्पदंश डिटेक्ट झाला. त्यानंतर तातडीने त्याला सर्पदंशाची लस देण्यात आली. तसेच अन् औषधोपचार सुरू केले. त्याच्या प्रकृतीत सुधारणा झाल्यानंतर तीन दिवसांनी व्हेटिलेटर काढण्यात आले. मंगळवारी तो पूर्ण बरा होताच त्याला घरी पाठवले.
अरमानवर अधिष्ठाता डॉ. एस. एस. मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली डॉ. एम. व्ही. बनसोडे, डॉ. श्रीकृष्ण कमठाणकर, डॉ. आस्था, डॉ. सारंग नर्सिंग स्टाफ विनय, अविनाश, अमित, परिचारिका राजश्री, अपुर्वा यांच्या पथकाने उपचार केले.
दरम्यान, अरमानचे वडील महमंद चौगुले, मामा हिशामुद्दीन चौगुले, अशरफ चौगुले, फहद मुजावर आदींनी सीपीआर हॉस्पिटलमधील डॉक्टरांची भेट घेऊन कृतज्ञता व्यक्त केली. त्यांना नगरसेवक जंगेश पठाण, बंटी सावंत यांच्या सहकार्य मिळाले. सीपीआर हॉस्पिटलमधील वैद्यकीय पथकाने सर्पदंशानंतर मृत्यूच्या दाढेतून अरमानला परत आणल्याबद्दल कासे ग्रामस्थांनी सीपीआरमधील वैद्यकीय पथकाची भेट घेऊन त्यांचा सत्कार केला.