प्रतिनिधी / बेळगाव
कर्नाटक सरकारचे दिल्ली येथील विशेष प्रतिनिधी शंकरगौडा पाटील यांच्या 63 व्या वाढदिनानिमित्त शहरात विविध उपक्रम राबविण्यात आले. प्रथम राणी चन्नम्मा चौकातील गणेश मंदिरात विशेष पूजेचे आयोजन करण्यात आले. त्यानंतर नंदन मक्कळ धाम व महेश फौंडेशन संचालित एचआयव्ही पीडित बालकांना फळे वितरित करण्यात आली. मुलांच्या उपस्थितीत केक कापून शंकरगौडा पाटील यांचा जन्मदिन साजरा करण्यात आला. कणबर्गी येथील सरकारी कन्नड प्राथमिक शाळेच्या आवारात वनमहोत्सव साजरा करण्यात आला. या कार्यक्रमप्रसंगी निलकंठ मास्तमर्डी, अरण्य विकास निगमचे सदस्य सुरेश देसाई, ऍड. एन. आर. लातूर, बेळगाव दूध उत्पादक संघाचे संचालक एस. एम. पवाडेप्पण्णावर, भाजपा युवा मोर्चा उत्तर विभागाचे अध्यक्ष सदानंद गुंटेप्पण्णावर, मल्लिकार्जुन बहाद्दूरी, पांडू धोत्रे, गजू मिसाळे, संदीप खन्नुकर, स्व-साहाय्यक सचिव शिवाजी सुनील देशपांडे, वैभव खाडे, भाजपा महिला सदस्या स्नेहा कोले, माजी महापौर शिवाजी सुंठकर, सिद्धू उप्पीन आदींसह शंकरगौडा पाटील सेवा प्रति÷ानचे अनेक सदस्य उपस्थित होते.