मागील काही काळापासून संजय कपूर आणि महीप कपूर यांची कन्या शनायाच्या बॉलिवूड पदार्पणासंबंधी अंदाज वर्तविले जात होते. पण आता शनाया ही करण कपूरचे प्रॉडक्शन हाउस धर्मा प्रॉडक्शन्सच्या बॅनर अंतर्गत पदार्पण करणार असल्याचे समोर आले आहे. करणने इन्स्टाग्रामवर याची घोषणा केली आहे.
आमच्या कुटुंबात आणखी एका सौंदर्यवतीची भर पडली आहे. डीसीए स्क्वॉडमध्ये शनाया कपूरचे स्वागत असल्याचे करणने चित्रफित प्रसारित करत म्हटले आहे. स्वतःच्या अभिनयातील पदार्पणापूर्वी शनाया स्वतःची छायाचित्रे आणि चित्रफितींमुळे प्रचंड लोकप्रिय ठरली आहे. शनायाने यापूर्वी जान्हवी कपूरचा चित्रपट ‘गुंजन सक्सेसन ः द कारगिल गर्ल’मध्ये सहाय्यक दिग्दर्शक म्हणूनही काम केले आहे. अनन्या पांडे आणि शनाया कपूरनंतर आता चाहत्यांना त्यांची बालपणीची मैत्रिण सुहाना खानच्या पदार्पणाची उत्सुकता आहे.