प्रतिनिधी/ बेळगाव
कोरोना महामारीमुळे जिल्हय़ातील आणखी 14 जणांचा मृत्यू झाला असून शनिवारी 1109 जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. जिल्हय़ातील रुग्णसंख्या रोज 1 हजाराच्या वरच असून मृत्यूचे प्रमाणही वाढत चालले आहे. गेल्या 24 तासांमध्ये 609 जण कोरोनामुक्त झाले आहेत.
शनिवारी सायंकाळी आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार आतापर्यंत 56 हजार 33 जणांना कोरोनाची बाधा झाली आहे. त्यापैकी 38 हजार 485 जणांनी कोरोनावर मात केली आहे. सक्रिय रुग्णांची संख्या वाढतच चालली असून 17 हजार 119 सक्रिय रुग्णांवर सध्या उपचार सुरू आहेत.
गेल्या 24 तासांमध्ये कोरोनामुळे 14 जणांचा बळी गेला आहे. एकूण मृतांचा आकडा 429 वर पोहोचला आहे. शनिवारी आढळलेल्या 1109रुग्णांमध्ये बेळगाव तालुक्मयातील 415 जणांचा समावेश आहे. 138 ग्रामीण व 277 शहर व उपनगरांतील रुग्णसंख्या आहे. अद्याप 20 हजार 722 जण चौदा दिवसांच्या होमकेअरमध्ये असून 2 हजार 284 जणांचे स्वॅब तपासणी अहवाल यायचे आहे.
गेल्या 24 तासांमध्ये बेळगाव तालुक्मयातील 10 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. हे सर्व मृत्यू सिव्हिल हॉस्पिटलमध्ये झाले आहेत. खासगी इस्पितळातील मृतांची यामध्ये नोंद नाही. याबरोबरच गोकाक येथील 2, अथणी व रामदुर्ग येथील प्रत्येकी एकाचा मृत्यू झाला असून 14 पैकी 4 महिलांचा समावेश आहे.
बेळगाव तालुक्मयात बेळगाव शहर व उपनगरांमध्ये दिवसेंदिवस रुग्णसंख्या वाढत आहे. सांबरा एटीएसमधील 12 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहे. याबरोबरच होनियाळ, आंबेवाडी, बडाल अंकलगी, बेळगुंदी, हिरेबागेवाडी, मारिहाळ, बाळेकुंद्री, बस्तवाड, बेनकनहळ्ळी, बाची, भुतरामहट्टी, चंदनहोसूर, देसूर, शिवापूर, बेळवट्टी, पिरनवाडी, गणेशपूर, मुतगा, मुचंडी, काकती, सावगाव, हिंडलगा, हलगीमर्डी, भेंडिगेरी, कंग्राळी खुर्द, उचगाव परिसरात पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत.
हंगरगा, किणये, पंतनगर, अष्टे, कंग्राळी बीके, शिंदोळी, न्यू वंटमुरी, हुंचेनहट्टी, समर्थनगर, वडगाव, भाग्यनगर, शाहूनगर, शिवबसवनगर, शिवाजीनगर, श्रीनगर, टिळकवाडी, तानाजी गल्ली, सदाशिवनगर, राणी चन्नम्मानगर, खासबाग, रामतीर्थनगर, रामदेव गल्ली-बेळगाव, रुक्मिणीनगर, सहय़ाद्रीनगर, अंजनेयनगर, अशोकनगर, बसवकॉलनी, रेल्वे क्वॉर्टर्स, चव्हाट गल्ली, कसाई गल्ली, कपिलेश्वर कॉलनी, खंजर गल्ली, कुवेंपुनगर, महांतेशनगर, गांधीनगर, न्यू गुड्सशेड रोड परिसरातही कोरोनाचे नवे रुग्ण आढळून आले आहेत.
द्वारकानगर, हनुमाननगर, इंडाल कॉलनी, जाधवनगर, जुने बेळगाव, ज्योतीनगर, विनायकनगर, भवानीनगर, वैभवनगर, वंटमुरी कॉलनी, वीरभद्रनगर परिसरातही कोरोनाचे रुग्ण आढळून आले आहेत. वाढत्या रुग्णसंख्येमुळे बेडची मोठय़ा प्रमाणात कमतरता भासत असून ऑक्सिजन आणि व्हेंटिलेटर बेड मिळविण्यासाठी तर नागरिकांना मोठय़ा प्रमाणात कसरतच करावी लागत आहे.