वृत्तसंस्था/ दुबई
मंगळवारी घोषित करण्यात आलेल्या महिलांच्या टी-20 फलंदाजांच्या ताज्या मानांकनात भारताच्या शफाली वर्माने आपले अग्रस्थान कायम राखले आहे. दरम्यान न्यूझीलंडची सोफी डिव्हाईन अष्टपैलूंच्या मानांकन यादीत संयुक्त आघाडीवर आहे.
महिलांच्या टी-20 फलंदाजांच्या मानांकन यादीत भारताची शफाली वर्मा 759 मानांकन गुणांसह पहिल्या स्थानावर असून ऑस्ट्रेलियाची बेथ मुनी 744 गुणांसह दुसऱया, भारताची टी-20 संघाची उपकर्णधार स्मृती मानधना 716 गुणांसह तिसऱया, ऑस्ट्रेलियाची मेग लॅनिंग 709 गुणांसह चौथ्या स्थानावर आहे. न्यूझीलंडच्या सोफी डिव्हाईनने 689 गुणांसह पाचव्या स्थानावर झेप घेतली आहे. महिला अष्टपैलूंच्या मानांकनात इंग्लंडची नताली स्किव्हेर आणि न्यूझीलंडची डिव्हाईन संयुक्त पहिल्या स्थानावर आहेत. भारताची दीप्ती शर्मा चौथ्या, ऑस्ट्रेलियाची एलीस पेरी पाचव्या, विंडीजची मॅथ्यूज सहाव्या स्थानावर आहे तसेच विंडीजची स्टिफेनी टेलर सातव्या स्थानावर आहे. फलंदाजांच्या मानांकन यादीत दक्षिण आफ्रिकेच्या लिझेली लीने आठव्या स्थानावर झेप घेतली आहे. गोलंदाजांच्या मानाकंन यादीत ऑस्ट्रेलियाची स्कट दुसऱया तसेच जेस जोनासन चौथ्या, भारताची दीप्ती शर्मा सहाव्या, पुनम यादव आठव्या स्थानावर आहेत.