- सिल्व्हर ओकवरील सहा जणांना कोरोनाची बाधा
ऑनलाईन टीम / मुंबई :
राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांची कोरोनाची चाचणी निगेटिव्ह आली आहे, अशी माहिती राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सोमवारी दिली.
ते म्हणाले, शरद पवार यांचे मुंबईतील निवासस्थान असलेल्या सिल्व्हर ओकवरील सहाजणांना कोरोनाची लागण झाली असल्याचे निष्पन्न झाल्यानंतर शरद पवार यांची मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात कोरोनाची चाचणी करण्यात आली त्याचे रिपोर्ट निगेटिव्ह आले आहेत.
दरम्यान, सिल्व्हर ओकवरील ज्या सहा जणांना कोरोनाची लागण झाली आहे, ते सर्वजण शरद पवार यांच्या ताफ्यातील सुरक्षारक्षक आहेत. सिल्व्हर ओकवरील इतर सर्व कर्मचाऱ्यांची नुकतीच कोरोना रॅपिड टेस्ट करण्यात आली होती. यामध्ये या सहाजणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला. तर काहीजणांचे अहवाल प्रलंबित आहेत. कोरोना पॉझिटिव्ह असलेल्या सुरक्षारक्षकांना सध्या क्वारंटाईन सेंटरमध्ये ठेवण्यात आले आहे.
तर शरद पवार यांच्या कुटुंबीयांची देखील कोरोना चाचणी करण्यात आली आहे. तसेच खबरदारी म्हणून शरद पवार यांचे सर्व कार्यक्रम देखील रद्द करण्यात आले आहेत.