अशोकराव पाटील यांची पालिकेकडे मागणी
प्रतिनिधी/ कराड
शहरात मोकाट कुत्री आणि जनावरांचा उपद्रव वाढला आहे. सद्या गणेशोत्सव सुरू असून नवरात्रोत्सवही जवळ आला आहे. कुत्र्यांनी लहान मुले, महिला, वयोवृद्ध लोकांवर हल्ले केले आहेत. त्यामुळे कुत्र्यांचा तातडीने बंदोबस्त करावा. निर्बिजीकरण मोहीम तातडीने राबवावी, अशी मागणी माजी नगरसेवक अशोकराव पाटील व मंगळवार पेठेतील नागरिकांनी पालिकेकडे केली आहे.
याबाबतचे निवेदन अशोकराव पाटील यांनी मुख्याधिकाऱयांना दिले. या निवेदनात म्हटले आहे की, मंगळवार पेठेतील कन्या प्रशाला परिसरात गेले 15 दिवस गटारे आणि पाईपलाईनचे काम करण्यात आले आहे. मात्र या परिसरात दुषित पाणी पुरवठा होत असून त्याचा नागरिकांना त्रास होत आहे. सद्या शहरात चिकुन गुणिया व डेंग्यूचे रूग्ण वाढत आहेत. त्यामुळे पाण्याचे नमुने तपासून स्वच्छ पाणी पुरवठा करण्यात यावा. कोरोना, चिकुन गुणिया, डेंग्यू रोगांचा प्रादुर्भाव पाहता औषध फवारणी, पावडर, फिनेल फवारणी करण्यात यावी. त्याबरोबरच मोकाट जनावरे, कुत्र्यांचाही बंदोबस्त करावा, अशी मागणी करण्यात आली आहे.
निवेदनावर झाकीर बागवान, इरफान बागवान, इम्रान बागवान, आयेशा पटेल, इब्राहिम शिकलगार, रज्जाक शिकलगार यांच्यासह नागरिकांच्या सहय़ा आहेत.