तरुण भारत संवाद प्रतिनिधी / सोलापूर
कोरोना साथीच्या आजाराचा विळखा वाढतच चालला असून सोलापूर शहरात आज रविवारी तब्बल १०६ रुग्ण सापडले. दिवसभरात चारजणांचा मृत्यू झाला असून आता एकूण शहर आणि जिह्यातील रुग्णांची संख्या तब्बल ३ हजार २२० एवढी झाली आहे. शहर आणि जिह्यात एकूण मृतांची संख्या २९६ एवढी झाली आहे.
काल प्राप्त झालेले अहवाल
प्राप्त अहवाल ३३९
निगेटिव्ह अहवाल २३३
पॉझिटिव्ह अहवाल १०६ (पुरुष ६३, स्त्री ४३)
मृत संख्या ४ (३ पुरुष, एक स्त्री)
रुग्णालयातून बरे होऊन गेलेल्यांची संख्या ५
ग्रामीण भागात १२ कोरोनाबाधित रुग्णांची भर
ग्रामीण भागात रविवारी १२ कोरोनाबाधित रुग्णांची भर पडली आहे. यामध्ये ७ पुरुष, पाच महिलांचा समावेश आहे. आतापर्यंत ५३२ कोरोनाबाधित रुग्ण झाले आहेत. उर्वरित २८८ रुग्णांवर उपचार सुरू असल्याचे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. बी. टी. जमादार यांनी सांगितले. मार्डी, नान्नज, बेलाटी, नवीन विडी घरकूल, हत्तूर, मुळेगाव, बोरामणी, जेऊरवाडी, सुखदेव नगर, बार्शी, कसबा पेठ, बार्शी, बारंगुळे प्लॉट, बार्शी, उपळाई रोड, बार्शी येथे नवे रुग्ण आढळले आहेत. आज 66 जणांचे अहवाल प्राप्त झाले होते. त्यातील ५४ अहवाल निगेटिव्ह आले आहेत, तर १२ पॉझिटिव्ह आढळले आहेत. ५३२ रुग्णांपैकी ३३९ पुरुष, १९३ महिलांचा आहेत. आतापर्यंत २५ जणांचा मृत्यू झाला आहे. एकूण २१९ जण बरे होऊन घरी गेले आहेत.
ग्रामीणमधील संख्या
अक्कलकोट ९८, मंगळवेढा १
बार्शी ९९, माढा ११
माळशिरस ६, मोहोळ २६
उत्तर सोलापूर ५२ करमाळा ४
सांगोला ४, पंढरपूर २५
दक्षिण सोलापूर २०६
एकूण ५३२
होम क्वारंटाईन १ हजार ६४९
आजपर्यंत तपासणी ४ हजार ६५०
प्राप्त अहवाल ४ हजार ६११
प्रलंबित अहवाल ३९
एकूण निगेटिव्ह ४ हजार ८०
कोरोनाबाधितांची संख्या ५३२
रुग्णालयात दाखल २८८
आतापर्यंत बरे २१९
मृत २५