प्रतिनिधी/कोल्हापूर
जिल्ह्यात गुरूवारी शहरातील कळंबा रोड जानाई दत्तनगर येथील 69 वर्षीय पुरूषाचा कोरोनाने शास्त्रीनगर येथील खासगी रूग्णालयात मृत्यू झाला. त्यामुळे कोरोना बळींची संख्या 1 हजार 727 झाली आहे. गेल्या 24 तासांत 14 नवे रूग्ण दिसून आले तर पाच जण कोरोनामुक्त झाले. सध्या 94 सक्रीय रूग्ण आहेत. दिवसभरात 448 जणांची तपासणी केल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अनील माळी यांनी दिली.
जिल्ह्यात केरोना बळींची संख्या 1727 झाली आहे. ग्रामीण भागात 849, नगरपालिका क्षेत्रात 348, शहरात 375 तर अन्य 155 जणांचा समावेश आहे. सध्या 94 सक्रीय रूग्ण आहेत. दिवसभरात 448 जणांची तपासणी केली. त्यातील 124 जणांची ऍटीजेन टेस्ट केली. शेंडा पार्क येथील लॅबमधून गुरूवारी 877 जणांचे रिपोर्ट आले. त्यातील 857 निगेटिव्ह आहेत. ऍटिजेंन टेस्टचे 106 रिपोर्ट आले. त्यातील 105 निगेटिव्ह आहेत. ट्रुनेटचे 96 रिपोर्ट आले, त्यापैकी 88 निगेटिव्ह आहेत. गेल्या 24 तासांत आजरा 4, भुदरगड 0, चंदगड 0, गडहिंग्लज 1, गगनबावडा 0, हातकणंगले 0, कागल 1, करवीर 3, पन्हाळा 0, राधानगरी 0, शाहूवाडी 0, शिरोळ 0, नगरपालिका क्षेत्रात 0, कोल्हापूर शहर 5 व अन्य 0 असे 14 रूग्ण आहेत. दिवसभरात पाच जणांना डिसचार्ज मिळाल्याने कोरोनामुक्तांची संख्या 48 हजार 152 झाले. नव्या 14 रूग्णांमुळे पॉझिटिव्ह रूग्णसंख्या 49 हजार 973 झाली आहे, अशी माहिती डॉ. माळी यांनी दिली.
14 नवे रूग्ण, 5 कोरोनामुक्त
पॉझिटिव्ह रूग्ण 14, कोरोनामुक्त 5, कोरोना मृत्यू 1
आजपर्यतचे कोरोना पॉझिटिव्ह रूग्ण ः 49 हजार 973
आजपर्यतचे कोरोनामुक्त रूग्ण ः 48 हजार 152
सध्या उपचार घेत असलेले कोरोना रूग्ण ः 94
आजपर्यतचे एकूण कोरोना बळी ः 1727
गेल्या 24 तासांत 448संशयितांची तपासणी