तरुण भारत संवाद, प्रतिनिधी / सोलापूर
सोलापूर शहरात मंगळवारी १८, तर ग्रामीण भागामध्ये १७ असे एकूण ३५ रुग्ण आढळून आले. ग्रामीणमध्ये १२, तर शहरात ३९ जणांच्या प्रकृतीत सुधारणा झाल्याने त्यांना घरी सोडण्यात आले. शहरात तिघांचा मृत्यू झाला. शहरात एकूण २ हजार २८३ रुग्ण आतापर्यंत पॉझिटिव्ह आढळून आले, तर ग्रामीणमध्ये ही संख्या ३६१ इतकी आहे.
शहरामध्ये मंगळवारी ८८ अहवाल प्राप्त झाले. त्यातील ७० निगेटिव्ह, तर १८ पॉझिटिव्ह आढळ्नू आले. त्यात ११ पुरुष, तर सात महिलांचा समावेश आहे. ग्रामीण भागात मंगळवारी १७ कोरोनाबाधित रुग्णांची भर पडली. यामध्ये १४ पुरुष, तीन महिलांचा समावेश आहे. आतापर्यंत ३६१ कोरोनाबाधित रुग्ण झाले आहेत. उर्वरित २०२ रुग्णांवर उपचार सुरू असल्याचे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. बी. टी. जमादार यांनी सांगितले.
आजचे कोरोनाबाधित रुग्ण बानेगाव एक, तिऱहे २, मार्डी एक, गाताडे प्लॉट, पंढरपूर एक, भक्त निवास, पंढरपूर एक, रुक्मिणी नगर, पंढरपूर एक, घोडके गल्ली, पंढरपूर एक, औदुंबर पाटील नगर, पंढरपूर एक, नवी पेठ, पंढरपूर एक, जुनी पेठ, पंढरपूर एक, क्रांतीनगर, मोहोळ दोन, मेहबूब नगर, मोहोळ एक, नागनाथ गल्ली, मोहोळ १, जेऊरवाडी एक, बोरगाव एक असे रुग्ण आढळून् आले आहेत. १२९ जणांपैकी ११२ अहवाल निगेटिव्ह, तर १७ पॉझिटिव्ह आढळले. ३६१ रुग्णांपैकी २२६ पुरुष १३५ महिला आहेत. आतापर्यंत १७ जणांचा मृत्यू झाला, तर आज १२ तर एकूण १४२ जण बरे होऊन घरी गेले आहेत.
शहरातील संख्या
एकूण तपासणी – १२ हजार ६९
निगेटिव्ह अहवाल – ९ हजार ७८६
पॉझिटिव्ह अहवाल – २ हजार २८३
एकूण मृत्यू – २५०
ग्रामीणमधील संख्या
अक्कलकोट – ६९ बार्शी – ५१
माढा – ८ माळशिरस – ५
मोहोळ – २१ उत्तर सोलापूर २८
करमाळा – १ सांगोला – ३
पंढरपूर १६ ,दक्षिण सोलापूर १५९
एकूण – ३६१
होम क्वारंटाईन – १ हजार ७२५
आजपर्यंत तपासणी – ३ हजार ८०७
प्राप्त अहवाल- ३ हजार ७७३
प्रलंबित अहवाल- ३४
एकूण निगेटिव्ह – ३ हजार ४१३
कोरोनाबाधितांची संख्या- ३६१
रुग्णालयात दाखल – २०२
आतापर्यंत बरे – १४२
मृत – १७