प्रतिनिधी/ सातारा
सातारा तालुका व शहर पोलीस ठाण्याने शहर व परिसरातील जुगार, मटका व्यवसायांवर करडी नजर वळवली असून दि. 6 रोजी शहर पोलीस ठाण्याच्या कर्मचाऱयांनी सातारा शहर परिसरातील तीन ठिकाणी सुरु असलेल्या जुगार अड्डय़ांवर छापे टाकत सहाजणांवर कारवाई केली. या छाप्यात संशयितांकडून सुमारे 13 हजार रुपये रोख व जुगाराचे साहित्य जप्त केले आहे.
सध्या कोरोनाची स्थिती असताना देखील शहरात पुन्हा जुगार, मटका व्यवसायिकांना पेव फुटले आहे. या अवैध व्यवसायांवर कारवाई करण्याच्या सूचना पोलीस निरीक्षक मांजरे यांनी केल्या होत्या. त्यानुसार पोलिसांनी सातारा बसस्थानकानजिक सेव्हन स्टार इमारतीच्या आडोशाने सुरु असलेल्या जुगार अड्डय़ावर छापा टाकला. तिथे मुनिबराज कुमार शर्मा (रा. करंजेपेठ, सातारा) याच्यावर कारवाई करुन त्याच्या ताब्यातील 1 हजार 160 रुपये व जुगाराचे साहित्य जप्त केले आहे.क्षेत्रमाहुली येथे एका बँकेच्या आडोशाने जुगार चालवणाऱया शंकर भीमराव धोत्रे (रा. शेंद्रे, ता. सातारा) याच्यावर कारवाई करुन त्याच्या ताब्यातील 5 हजार 160 रुपये व जुगारचे साहित्य जप्त करण्यात आले असून त्याला अटक करण्यात आली आहे. तर कामाठीपुऱयात जुगार चालवणाऱया गोपाळ शंकर जाधव (रा. गोडोली, सातारा) याच्यावर कारवाई करत त्याच्या ताब्यातील 6 हजार 540 रुपये व जुगाराचे साहित्य जप्त करण्यात आले आहे. या दोन्ही अड्डय़ांचा मालक समीर कच्छी रा. मोळाचा ओढा याचा पोलीस शोध घेत आहेत. दरम्यान सातारा तालुका पोलिसांनी शेंद्रे, ता. सातारा येथे टाकलेल्या छाप्यात जुगार चालवणाऱया रमेश दिनकर जावलीकर (रा. कामाठीपुरा, सातारा) याच्यावर कारवाई केली असून त्याच्या ताब्यातील 742 रुपये रोख रक्कम व जुगाराचे साहित्य जप्त केले.