प्रतिनिधी/ फलटण
फरांदवाडी ( ता. फलटण ) येथील तावडी फाटय़ावरून विनापरवाना गुटख्याची वहातुक करताना शहर पोलिसांनी ओमनी गुटखा यासह सुमारे 4 लाख95हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे.
सतिश कदम वय 26 ( रा. झडकबाईची वाडी ता. फलटण ) हा इसम आपल्या चारचाकी ओमनी कारमधुन सुमारे 1 लाख95 हजार रूपये किमंतीचा विमल नावाच्या गुटखा अनाधिकृत विनापरवाना वहातुक करीत असताना शहर पोलिसांनी रंगेहात पकडला त्याचे ताब्यातील चारचाकी व गुटखा साहित्य असा एकुण 4 लाख95 हजार रु पये किंमतीचा मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केला या घटनेची फिर्याद सातारा येथील अन्न सुरक्षा आधिकारी विकास सोनवणे यांनी शहर पोलिसात दिली सदरची कारवाई उपविभागीय पोलिस अधिकारी तानाजी बरडे शहर पोलिस निरीक्षक भारत किंद्रे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस अधिकारी सचिन राऊळ् संदिप बनकर सर्जेराव सुळ विक्रांत लावंड नितीन भोसले सुजित मेंगावडे यांनी केली