प्रतिनिधी/ बेळगाव
शहापूरमध्ये प्रत्येक शनिवारी भरणारा आठवडी बाजार पुन्हा एकदा फुलू लागला आहे. दाणे गल्ली व सराफ गल्ली येथे हा आठवडी बाजार भरत आहे. कायमच्या विपेत्यांसोबत आसपासच्या भागातील शेतकरी आपला भाजीपाला घेऊन या ठिकाणी विक्री करण्यास येत असतात. लॉकडाऊननंतर बऱयाच दिवसांनी शहापूरचा बाजार पुन्हा बहरू लागला आहे.
शनिवारी सकाळपासूनच शहापूरच्या बाजारात ग्राहकांची वर्दळ होती. मुख्य रस्त्याच्या काँक्रिटीकरणाचे काम सुरू असल्यामुळे विपेत्यांना सराफ गल्ली येथे भाजी व साहित्य विक्री करण्यास सांगण्यात आले आहे. दाणे गल्ली येथील भाजी मार्केट येथे बाजार भरत आहे. भाजीपाल्यासोबतच कडधान्याची विक्री या ठिकाणी करण्यात येते. ग्रामीण भागातील शेतकरी व विपेतेही शनिवारी भाजीपाला घेऊन बाजारात आले होते. मुळा, पालक, पालेभाजी, टोमॅटो, फ्लॉवर, कोबी, बिन्स, वांगी, बटाटे, काकडी, मेथी, कोथिंबीर यांची विक्री करण्यात येत होती. शहापूर, वडगाव हिंदवाडी परिसरातील नागरिक भाजी खरेदीसाठी या ठिकाणी येतात.