मनपा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शक्तिप्रदर्शन
प्रतिनिधी /बेळगाव
महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मंगळवारपासून शहरातील वेगवेगळय़ा भागात पथसंचलन सुरू आहे. बुधवारी दुसऱया दिवशी शहापूर, अनगोळ परिसरात पथसंचलन झाले.
पोलीस उपायुक्त डॉ. विक्रम आमटे, खडेबाजारचे एसीपी ए. चंद्राप्पा आदी वरिष्ठ अधिकाऱयांच्या उपस्थितीत टिळकवाडी, उद्यमबाग व शहापूर पोलीस स्थानकांच्या कार्यक्षेत्रात पोलिसांनी पथसंचलन केले. संवेदनशील भागात पोलिसांचे शक्तिप्रदर्शन सुरू आहे.
अनगोळ, बजंत्री गल्ली, कुरबर गल्ली, धर्मवीर संभाजी चौक, राजहंस गल्ली, वाडा कंपाऊंड, आंबेडकनगर, कलमेश्वर मंदिर रोड, जेरे गल्ली, मारुती गल्ली, लक्ष्मी गल्ली, रघुनाथपेठ, मुस्लीम गल्ली, चौथे रेल्वेगेट, शिवशक्तीनगर, झटपट कॉलनी, स्वामी विवेकानंद रोड, चिदंबरनगर, नाथ पै सर्कल, काकेरु चौक, अळवाण गल्ली, जेड गल्ली, खडेबाजार-शहापूर, गणेशपूर गल्ली, नवी गल्ली, खासबाग रोड, बसवेश्वर सर्कल, बाजार गल्ली, तेग्गीन गल्ली, कलमेश्वर रोड, धामणे रोड, विष्णू गल्ली, ब्रह्मनगर, पाटील गल्ली, मंगाई मंदिर परिसरात पथसंचलन करण्यात आले.