प्रतिनिधी / बेळगाव
गाडेमार्ग-खासबाग परिसरात एका तरुणावर हल्ला करण्यात आला आहे. बुधवारी रात्री 8.15 वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली असून या घटनेनंतर परिसरात खळबळ माजली आहे.
शेखर ज्ञानेश्वर शहापूरकर (वय 25, रा. गणेशपूर गल्ली, शहापूर) असे जखमी तरुणाचे नाव आहे. त्याला तातडीने सिव्हिल हॉस्पिटलला हलविण्यात आले आहे. त्याच्या डोक्मयाला इजा पोहोचल्याचे पोलिसांनी सांगितले. घटनेची माहिती समजताच पोलीस निरीक्षक राघवेंद्र हवालदार व त्यांचे सहकारी घटनास्थळी दाखल झाले.
दोघा जणांनी शेखरवर हल्ला केला आहे. डोक्मयावर कोणत्या हत्याराने प्रहार करण्यात आला याचा उलगडा झाला नाही. हल्ल्यानंतर दोघे जण फरारी झाले असून कोणत्या कारणासाठी हा प्रकार घडला?, हल्लेखोर कोण? याचा उलगडा रात्री उशिरापर्यंत झाला नाही. शहापूर पोलीस पुढील तपास करीत आहेत.