रात्री उशिरा अंत्यसंस्कार;त्यांची मुलगी आणि पुतण्याच्या हस्ते त्यांना चिताग्नी
वार्ताहर / कोरेगाव
जिह्यातील कोरेगांव तालुक्यातील अंबवडे सं.वाघोली येथील शहीद जवान दत्तात्रय बाळकृष्ण सकुंडे अनंतात विलीन काल रात्री बुधवारी (ता.17) रात्री उशिरा अंबवडे सं वाघोली त्यांच्या मुळ गावी शोकाकूल वातावरणात त्यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. शहीद जवान दत्तात्रय सकुंडे यांना अखेरचा निरोप देण्यासाठी कुटुंबीय ,मित्रपरिवारासह , पंचक्रोशीतील हजारो नागरिक अंबवडे संमत वाघोली या ठिकाणी आले होते.
अंबवडे सह आजुबाजुच्या परिसरात देशभक्तीपर वातावरण निर्माण झाले होते.अंत्ययात्रेला देशभक्तीपर गीते वाजवली जात होती.अंत्ययात्रेत सहभागी झालेले तरूण ’भारत माता की जय’ , ’वंदे मातरम्’, ’अमर रहे ….अमर रहे शहीद जवान अमर रहे’ अशा घोषणा देत होते. डेहराडून येथे कर्तव्य बजावत असताना त्यांना वीरमरण प्राप्त झाले. काल रात्री उशिरा त्यांचे पार्थिव त्यांच्या गावी अंबवडे संमत वाघोली येथे आणण्यात आले. फुलांनी सजवलेल्या ट्रक्टरमधून स्मशानभूमीपर्यंत त्यांची अंत्ययात्रा काढण्यात आली.अंबवडे येथील स्मशानभूमीत त्यांच्या पार्थिवावरील मानाचा तिरंगा त्यांच्या वीरमाता आणि वीरपत्नी यांच्यांकडे सुपूर्द करण्यात आला.त्यांच्या माघारी त्यांची आई,पत्नी,मुलगी ,भाऊ,वहीनी आणि पुतण्या पुतणी असा परिवार आहे.याप्रसंगी आर्मीच्या फाइव्ह ग्रेनेडियरचे सुभेदार लखन सिंह , कोरेगावचे तहसिलदार अमोल कदम , गटविकास अधिकारी क्रांती बोराटे,वाठारचे सहाय्यक पोलिस निरीक्षक स्वप्नील घोंगडे,जिल्हा सैनिक कल्याणचे आप्पासाहेब कोडग,जिल्हा कृषी सभापती मंगेश धुमाळ, पंचायत समिती सदस्य साधना बनकर, सरपंच शुभांगी सकुंडे व ग्रामस्थ तसेच आजी माजी सैनिक संघटना अंबवडेचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते. ङदत्तात्रय यांचे पार्थिव पाहून कुटूंबीयांनी आक्रोश केला.अंत्यदर्शनासाठी आलेले सर्वचजण भावूक झाले होते. देशभक्तीपर गीतांनी आणि भारत माता की जय वीर जवान दत्तात्रय सकुंडे अमर रहे अशा घोषणांनी आसवंत दुमदुमून निघाला