बेळगाव : नूतन पोलीस उपायुक्त विक्रम आमटे यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करताना नेताजी जाधव व इतर.
प्रतिनिधी / बेळगाव
बेळगाव शहराचे पोलीस उपायुक्त विक्रम आमटे आणि शहापूर पोलीस स्थानकाचे एसीपी कट्टीमनी यांची शहापूरच्या शांतता कमिटीच्या कार्यकर्त्यांनी भेट घेतली. यावेळी माजी नगरसेवक नेताजी जाधव यांच्या हस्ते नूतन पोलीस उपायुक्त विक्रम आमटे यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला व त्यांना सदिच्छा देण्यात आल्या.
यावेळी उपायुक्त आमटे यांनी शहापूरमधील समस्यांचा आढावा घेतला. येथील समस्यांबाबत माहिती जाणून घेऊन समस्या त्वरित सोडवू, अशी ग्वाही दिली. यावेळी माजी नगरसेवक रमेश सोनटक्की, अशोक चिंडक, राजू सुतार, निंबाळकर आदी उपस्थित होते.