प्रतिनिधी / सांगली
संपुर्ण क्षमतेने काम करण्यासाठी कार्यालयीन वातावरण ही उत्साहवर्धक असणे आवश्यक आहे. तत्पर सेवेसाठी शासकीय कार्यालयांच्या बळकटीकरण व सुसज्जतेवर भर देण्यात येईल. विविध शासकीय कार्यालयांनी त्यांना आवश्यक असणाऱ्या सामग्रीच्या मागणीचे प्रस्ताव विहित पध्दतीने सादर करण्याचे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी केले.
सांगलीचे तृत्तीय विशेष लेखापरिक्षक वर्ग 1, सहकारी संस्था (साखर) बाळासाहेब यादव यांच्या कार्यालयातील नवीन केबिन्स व फर्निचर कामाचा उद्घाटन जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांच्याहस्ते झाले. यावेळी ते बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी सुसज्ज कार्यालयातून अधिक गतीमान कामकाज व्हावे, तत्पर सेवा दिली जावी अशी भावना व्यक्त केली.
या प्रसंगी कार्यकारी अभियंता सार्वजनिक बांधकाम संतोष रोकडे, कोल्हापूर विभागाचे प्रादेशिक सहसंचालक (साखर) डॉ. एस. एन. जाधव, तृत्तीय विशेष लेखापरिक्षक वर्ग 1, सहकारी संस्था (साखर) बाळासाहेब यादव, जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था निलकंठ करे, जिल्हा विशेष लेखापरिक्षक वर्ग 1 सहकारी संस्था किरणसिंह पाटील, जिल्हा नियोजन अधिकारी सरिता यादव, जिल्हा माहिती अधिकारी वर्षा पाटोळे, जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन अधिकारी जमिर करीम, द्वितीय विशेष लेखापरिक्षक वर्ग – 1 श्रीधर कोल्हापुरे, विशेष लेखापरिक्षक वर्ग – 1 सहकारी (सुतगिरणी) डी. पी. देसाई यांची प्रमुख उपस्थिती होती.