ओटवणे /प्रतिनिधी-
शासकीय आधारभूत किंमत भात खरेदी योजनेअंतर्गत प्रोत्साहनपर जिल्ह्यातील प्रति क्विंटल सातशे रुपये बोनसच्या ५७५८१४९६ रूपये रकमेपैकी ५० टक्के रक्कम शासनाकडून राज्य मार्केटिंग फेडरेशनला प्राप्त झाली आहे.
त्यामुळे तब्बल तीन महिन्याच्या प्रतीक्षेनंतर जिल्ह्यातील ६८९० शेतकऱ्यांना बोनसची एकूण २८७९०७४८ रक्कम आठवडाभरात मिळणार आहे. याबाबत दि महाराष्ट्र स्टेट को-ऑपरेटिव्ह मार्केटिंग फेडरेशचे व्यवस्थापक अतुल नेरकर यांनी जिल्हा पणन कार्यालयाला कळविले असून बोनसची ही पन्नास टक्के रक्कम त्वरित शेतकऱ्यांच्या खात्यात वर्ग करण्याच्या सूचना केल्या आहेत.
शासकीय आधारभूत किंमत भात खरेदी योजनेचा यावर्षी जिल्ह्यातील एकूण 6890 शेतकऱ्यांनी लाभ घेतला आहे. गेल्यावर्षी जिल्ह्यात 36802:13 क्विंटल तर यावर्षी 82259,28
क्विंटल दुप्पटीहुन अधिक भात खरेदी झालेली आहे. गेल्यावर्षी भात विक्रीतून शेतकऱ्यांना 66941066 रुपये रक्कम आणि 25817491 रुपये बोनस मिळून 9 कोटी 27 लाख 58557 रुपये प्राप्त झाले होते तर यावर्षी
15,36, 60,335 रुपये मिळाले. मात्र या भात खरेदीवरील एकूण 57581496 रूपये बोनसच्या प्रतीक्षेत गेले तीन महिने शेतकरी होते