संपावर असलेल्या लाईफगार्डची मागणी, सोमवारपासून उपोषण सुरू
प्रतिनिधी/ पणजी
शास्वत नोकरीबाबत आम्हाला लेखी आश्वासन मिळाल्याशिवाय संप मागे घेणार नाही. असा ठाम निर्णय संपावर असलेल्या लाईफगार्डने घेतला आहे. सोमवार पासून त्यांनी उपोषणाला सुरुवात केली आहे. गरज भासल्यास आमच्या कुटुंबियांना संपात सामाहून घेणार असे संपाचे नेतृत्व करणाऱया स्वती केरकर यांनी सांगितले.
प्रशिक्षित असलेले तसेच 10 ते 12 वर्ष दृष्टी कंपनीत काम केलेले 260 लाईफगार्डनी आपल्या विविध मागणीसांठी कंपनीच्या कारभारा विरोधात संपपूकारला होता. नंतर त्यांना कामावरून कमी करण्यात आले. गेल्या वर्षभरापून ते आपल्या हक्कासाठी सरकार दरबारी हेलपाटे घालीत आहेत. दुर्दैवाने त्यांच्याकडे कोणीचा गांर्भियाने पाहत नाही अखेर त्यांनी संपाचा मार्ग स्विकारला गेल्या जो पर्यंत नोकरी मिळत नाही तोपर्यंत आझादमैदान सोडणार नाही असा ठोस निर्णय घेऊन येथील आझाद मैदानावर संप सूरू केला आहे.
मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी एका कार्यक्रमात जाहिर केले आहे की संपावर असलेल्या लाईफगार्डना गोवा मनुष्यबळ सोसायटीत समाविष्ट करून घेणार असल्याचे वर्तमानपत्रात बातम्या प्रसिध्द झाल्या आहेत. प्रत्यक्षात आम्हाला कोणतीच माहिती देण्यात आली नाही असे केरकर यांनी सांगितले. सरकारने लाईफगार्डना सोसायटीत समाविष्ट करून घेतल्यास हरकत नाही मात्र त्यांना लाईफगार्डचीच नोकरी मिळणे गरजेचे आहे. कारण हे लाईफगार्ड पूर्ण प्रशिक्षित असून त्यांच्याजवळ अनुभवाचीही कमी नाही. असेही स्वाती केरकर यांनी सांगितले.