शाहूपुरी ग्रामविकास आघाडीने घेतली भेट : पाठपुरावा करण्याचे आश्वासन
प्रतिनिधी / सातारा
कोराना, शहर हद्दवाढ या पार्श्वभूमीवर शाहूपुरी अंतर्गत अनेक रखडलेल्या विकास प्रकल्पांच्या पूर्ततेसाठी शाहूपुरी ग्रामविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी नुकतीच आमदार शिवेंद्रराजे भोसले यांची सुरुचि या निवासस्थानी भेट घेतली. यावेळी झालेल्या चर्चेवेळी आमदार भोसले यांनी सदरप्रश्नी लक्ष घालून पाठपुरावा करण्याचे आश्वासन दिले.
याप्रसंगी झालेल्या चर्चेत मंजूर रस्ते कामांपैकी शाहूपुरीतून जाणारा सुमारे 5 कोटी रुपये अंदाजपत्रकीय रकमेचा म्हसवे-पिलेश्वरी-मोळाचा ओढा ते शाहूपुरी चौक मार्गे सारखळ रस्ता डांबरीकरण, सुमारे 50 लक्ष रुपये अंदाजपत्रकीय रकमेचा बुधवार नाका ते मोळाचा ओढा रस्ता डांबरीकरण तसेच, मोळाचा ओढा ते गंगासागर कॉलनी व परिसरारला जोडणारा रस्त्याचा विकास आराखडय़ात समावेश करणे तसेच, हद्दवाढीनंतर नागरिकांना मिळावयाच्या मूलभूत सुविधा व शाहूपुरीवासियांसाठी सर्वात महत्वाचा प्रश्न म्हणजे शाहूपुरीची रेंगाळलेली 33 कोटी अंदाजपत्रकीय रकमेची चोवीस बाय सातची नवीन कण्हेर पाणी पुरवठा योजना.या सर्व प्रश्नी बाबाराजेंशी शिष्टमंडळातील सर्व सदस्यांनी सवीस्तर चर्चा करून याप्रश्नी वरिष्ठ पातळीवर पाठपुरावा करण्यासाठी आग्रह धरला.
यावेळी आमदार भोसले यांनी याप्रश्नीच्या तांत्रिक अडचणींची संबंधित विभागाकडून माहिती घेऊन पाठपुरावा करण्याचे आश्वासन दिले. याप्रसंगी आघाडीच्यावतीने भारत भोसले, ग्रा. पं. सदस्य राजेंद्रकुमार मोहिते, नवनाथ जाधव, सुहास वहाळकर, शोभा केंडे, निलम देशमुख, माधवी शेटे तसेच कार्यकर्ते उपस्थित होते.