प्रतिनिधी / बेळगाव
कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर दुसऱयांदा लॉकडाऊन करण्यात आले आहे. त्यामुळे रस्त्यांवर विनाकारण फिरणाऱया नागरिकांना पोलिसांकडून समज देण्यात येत आहे. टास्क फोर्स आणि ग्रामपंचायत सदस्यही कोरोना पसरू नये म्हणून जनजागृती करत आहेत. बेडकीहाळ येथे शिंगाडे चॅरिटेबल ट्रस्टच्यावतीने लॉकडाऊन काळात उन्हात थांबून जनतेची सेवा करत असलेल्या पोलीस कर्मचाऱयांना जेवण, चहा आणि पाण्याची व्यवस्था करून सामाजिक बांधिलकी जपण्यात येत आहे.