ऑनलाईन टीम / मुंबई :
सध्या जगभरात कोरोना व्हायरसने थैमान घातल आहे. भारतात देखील कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वेगाने पसरत आहे. सध्या भारतात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्व शाळा आणि महाविद्यालये बंद आहेत.
आज म्हणजेच 5 सप्टेंबर रोजी भारताचे पहिले उप-राष्ट्रपती डॉ.सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधत देशात शिक्षक दिन साजरा करण्यात येतो. ते शिक्षक होते. त्यांच्या वाढदिवसा निमित्ताने त्यांचे विद्यार्थी त्यांना भेटायला येत असत.
या खास दिनासाठी गुगलने आपल्या खास शैलीत डूडल बनवून शिक्षकांना शुभेच्छा दिल्या आहेत. शिक्षक दिनानिमित्त गुगलच्या या खास डूडलमध्ये पट्टी, लॅपटॉप, पुस्तकं इत्यादी शाळेत लागणारी साहित्य दिसत आहे.
माझा वाढदिवस शिक्षक दिन म्हणून साजरा करावा अशी त्यांनी इच्छा व्यक्त केली होती. तेव्हापासून ते आतापर्यंत देशात डॉ.सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्मदिवस शिक्षक दिन म्हणून साजरा करण्यात येतो.