वृत्तसंस्था/ कोलंबो
भारताचा कर्णधार शिखर धवनने सलामीवीर म्हणून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 10 हजार धावांचा टप्पा ओलांडला आहे. येथे रविवारी झालेल्या लंकेविरूद्धच्या पहिल्या वनडे सामन्यात धवनने नाबाद 86 धावांची खेळी केली होती.
वनडे क्रिकेटमध्ये 6 हजारपेक्षा अधिक धावा जमविणाऱया भारतीय फलंदाजांच्या यादीत धवन दहावा फलंदाज आहे. सलामीचा फलंदाज म्हणून यापूर्वी भारताच्या वीरेंद्र सेहवाग, सचिन तेंडुलकर, सुनील गावसकर आणि रोहित शर्मा यांनी असा पराक्रम केला आहे. भारतातर्फे वनडेमध्ये 6 हजारहून अधिक धावांचा टप्पा गाठणाऱया फलंदाजांमध्ये तेंडुलकर, कोहली, गांगुली, द्रविड, धोनी, मोहम्मद अझहरूद्दीन, रोहित शर्मा, युवराज सिंग, सेहवाग यांचा समावेश आहे. भारताच्या या नऊ फलंदाजांनी वनडेत सहा हजारपेक्षा अधिक धावा जमविल्या आहेत.