प्रतिनिधी / शिरोळ
पोलीस दलात बदल व सुधारणा करताना शेवटचा कर्मचारी सक्षम झाला पाहिजे, त्यादृष्टीने कोल्हापूर पोलीस दल काम करीत असून कोणतेही काम मनापासून सेवा म्हणून केले तर दर्जेदार कामाची गुणवत्ता मिळते, शिरोळ पोलीस ठाण्याने नव्याने इमारत बांधकाम करताना योग्य ती काळजी घेतली आहे , शिरोळ पोलिसांची ही कामगिरी अभिनंदनीय व कौतुकास्पद आहे. असे मत कोल्हापूर जिल्हा पोलीस प्रमुख डॉ. अभिनव देशमुख यांनी व्यक्त केले.
शिरोळ पोलीस ठाण्याच्या इमारतीत शासनाच्या निधीतून नव्याने बांधण्यात आलेल्या कॉन्फरन्स हॉल चे उद्घाटन जिल्हा पोलीस प्रमुख डॉ अभिनव देशमुख यांच्या हस्ते शुक्रवारी करण्यात आले , यावेळी मान्यवरांच्या हस्ते कोनशीला उद्घाटन झाले, प्रारंभी
शिरोळ पोलीस ठाण्याचे पोलीस अधिकारी शिवानंद कुंभार यांच्या हस्ते मान्यवरांचा सत्कार करण्यात आला.
यावेळी जिल्हा पोलीस प्रमुख डॉ अभिनव देशमुख म्हणाले ,पोलीस ठाण्यात काम करताना गुन्हे घडणार नाहीत, याबाबत पोलीस अधिकारी व कर्मचारी हे दक्षता घेतात, पण घडलेल्या घटनांमधील गुन्हे उघडकीस आणण्याबाबत जसे महत्त्व आहे, तसे शासनाचा निधी योग्य व वास्तव खर्च करताना दक्ष पाहिजे, शिरोळ पोलीस ठाण्याचे अधिकारी कुंभार यांनी याबाबत विशेष लक्ष देऊन दर्जेदार व गुणवत्तेची सुसज्ज इमारत बांधून एक आदर्श निर्माण केला आहे, त्यांच्या कामाचे कौतुक करण्यासारखे आहे असे सांगून त्यांनी शिरोळ पोलीस ठाण्यास उत्कृष्ट कामकाजाबाबत शुभेच्छा दिल्या.
यावेळी अप्पर पोलीस अधीक्षक श्रीनिवास घाडगे, उपविभागीय पोलीस अधिकारी किशोर काळे, उपविभागीय पोलिस अधिकारी प्रणील गिल्डा यांच्यासह पोलिस अधिकारी, कर्मचारी ,गृहरक्षक दल यांच्यासह पत्रकार उपस्थित होते, सहा पो. नि. शिवानंद कुंभार यांनी आभार मानले . पत्रकार दगडू माने यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले
शिरोळ पोलीस ठाण्याच्या इमारतीमधील नूतन कॉन्फरन्स सभागृहाचे उद्घाटन करताना जिल्हा पोलीस प्रमुख डॉ अभिनव देशमुख , शेजारी पोलीस अधिकारी श्रीनिवास घाडगे , किशोर काळे, प्रणील गिल्डा व शिवानंद कुंभार